तीन लाखांचा गुटखा जप्त

By Admin | Updated: August 21, 2015 01:15 IST2015-08-21T01:15:25+5:302015-08-21T01:15:25+5:30

स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई.

Three lakh gutkha seized | तीन लाखांचा गुटखा जप्त

तीन लाखांचा गुटखा जप्त

अकोला: मध्य प्रदेशातील बैतुल येथून मूर्तिजापूर शहरात गुटखा येऊन जाणार्‍या मालवाहू वाहनाला अडवून त्यातील तीन लाख २७ हजार रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केला. बैतुल येथून आलेला गुटखा एका वाहनाद्वारे मूर्तिजापूरकडे जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मूर्तिजापूर बायपासवर सापळा रचला. या ठिकाणी एमएच ३0, एबी ३२१0 क्रमांकाचे मालवाहू वाहन येताच, पोलिसांनी ते अडविले. वाहन आणि त्यातील तीन लाख २७ हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला. वाहनाचा चालक प्रवीण रामकृष्ण गावंडे याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी असता, हा गुटखा मूर्तिजापुरातील व्यापारी गोपाल अशोक अग्रवाल याचा असल्याचे सांगितले. त्यालाही अटक केली. आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.

Web Title: Three lakh gutkha seized