राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 19:48 IST2017-11-26T19:38:48+5:302017-11-26T19:48:54+5:30

Three car accidents in the national highway; Traffic disorder | राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; वाहतूक विस्कळीत

राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; वाहतूक विस्कळीत

ठळक मुद्देट्रेलर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने तीन  वाहने एकमेकांवर आदळलीतीन किमीपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने तीन वाहने एकमेकांवर आदळल्याची घटना भिकुंड नदीच्या पुलावर २६ नोव्हेंबर  रोजी घडली. यामध्ये सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. मात्र, महामार्गावरील  वाहतूक विस्कळीत होऊन दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठय़ा प्रमाणात रांगा  लागल्या होत्या. 

बाळापूर बायपासवरील भिकुंड नदीच्या पुलावर टॅँकर क्रमांक एम.एच. एक्यू  ५२0१  केमिकल घेऊन जात होता. दरम्यान, या टॅँकरच्या चालकाने अचानक  ब्रेक लावल्याने त्याच्या मागून येणारा  ट्रेलर एच.आर. ५५ एक्स ३१२७ त्यावर  आदळला. तसेच त्यामागून येत असलेले  इंडियन गॅस टँकर क्र. एम.एच. १२  के. पी. ६८५९ ने समोरच्या टँकरला धडक दिली. यामध्ये तिन्ही वाहनांचे  मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या विचित्र अपघातामुळे मार्गावरील वाहतूक  विस्कळीत झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने ३-३ कि.मी. पर्यंत वाहनांच्या  रांगा लागल्या होत्या. 

Web Title: Three car accidents in the national highway; Traffic disorder