शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

तीन सट्टा माफियांकडे दहा कोटींच्यावर ‘बेटिंग’!

By admin | Published: June 20, 2017 4:58 AM

१५ मोबाइलच्या तपासणीत त्यांचे पाच एजंट सातत्याने कार्यरत असल्याचेही समोर आले.

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : न्यू तापडियानगरमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा मारून तीन बड्या सट्टा माफियांना अटक केल्यानंतर त्यांच्या मोबाइल व लॅपटॉपमधील तपासणीत तब्बल १0 कोटींच्यावर बेटिंग या तिघांकडे लावल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. १५ मोबाइलच्या तपासणीत त्यांचे पाच एजंट सातत्याने कार्यरत असल्याचेही समोर आले असल्याने यामध्ये आणखी बडे मासे गळाला लागणार असल्याची माहिती आहे.भारत-पाकिस्तान या दोन संघामध्ये रविवारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम सामना खेळल्या गेला. या सामन्यावर देशभर मोठय़ा प्रमाणात सट्टा लावण्यात आला असून, अकोल्यातही कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. न्यू तापडियानगरात पवन वाटिकेमध्ये बोरगाव खुर्दच्या सरपंच पती श्यामकुमार नरेशकुमार हेडा (४८), कल्पेश स्वरूपचंद अग्रवाल (३४) रा. गुलजारपुरा, ललित देवीदास सुरेखा (५५) रा. जुना भाजी बाजार या तीन मोठय़ा सट्टाबाजांनी मोठय़ा प्रमाणात बेटिंग सुरू केल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे याना मिळाली. त्यांनी पवन वाटिकेत छापा टाकून तीनही सट्टा माफियांना रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून १५ मोबाइलसह लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी पाच एजंटमार्फत तब्बल १0 कोटी रुपयांच्यावर बेटिंग केल्याची माहिती उजेडात आली आहे. शहरात या तीन मोठय़ा सट्टा माफियांचे एजंट केवळ सट्टा घेण्यासाठी कार्यरत होते, हा आकडा १0 कोटींच्याही प्रचंड वर जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. १0 कोटी रुपयांच्यावर बेटिंग लावल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी तपासात मोठे मासे आणि हा आकडा प्रचंड फुगणार एवढे निश्‍चित.एजंटचे कोल्हापूर, धुळे कनेक्शनपवन वाटिकेतून अटक केलेल्या तीन मोठय़ा सट्टा माफियांच्या संपर्कात अकोल्यातील तीन एजंट आणि कोल्हापूर व धुळे येथील प्रत्येकी एक एजंट संपर्कात असल्याचे पोलिसांच्या तपासणीत समोर आले आहे. कोल्हापूर, धुळे येथील अनेकांनी या तिघांकडे मोठा सट्टा लावला होता. यासोबतच संपूर्ण राज्यात या तिघांचे एजंट कार्यरत होते, या दिशेने तपास करण्यात येत आहे.बडे माफिया अडकणार!अकोल्यातील मोठ-मोठय़ा आलिशान निवासस्थानांमध्ये राहणारे बडे सट्टा माफिया यामध्ये अडकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सदर प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सखोल आणि सूक्ष्मरीत्या होणार असल्याने यामध्ये मोठय़ा हस्ती असलेल्या माफियांचा पर्दाफाश होणार आहे.