तिघांवर तलवारीने प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:17 IST2020-02-08T12:17:22+5:302020-02-08T12:17:33+5:30

एका कुटुंबातील तिघांवर सहा जणांनी तलवार, लोखंडी पाइपने हल्ला चढविला.

Three attack with sword | तिघांवर तलवारीने प्राणघातक हल्ला

तिघांवर तलवारीने प्राणघातक हल्ला

अकोला: जुन्या वादातून दोन कुटुंबात शुक्रवारी दुपारी चांगलाच राडा झाला. एका कुटुंबातील तिघांवर सहा जणांनी तलवार, लोखंडी पाइपने हल्ला चढविला. यात तिघे जण गंभीर जखमी झाले. यातील दोघांवर सर्वोपचार रुग्णालयात तर एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात खदान पोलिसांनी सहा जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
जेतवन नगरात राहणारा मोहम्मद इरफा मो. आरिफ याच्या तक्रारीनुसार त्याचा भाचा सैयद जुबेर सै. रशिद याचा विवाह जहागीर पटेल याची बहीण मुन्नी हिच्यासोबत झाला होता; परंतु आठ महिन्यांतच त्यांचा तलाक झाला. यामुळे दोन्ही कुटुंबात वाद निर्माण झाला होता. यातून जहागीर पटेल हा नेहमी घरासमोरून जाताना, रागाने पाहायचा व शिवीगाळ करायचा.
शुक्रवारी दुपारी याच कारणावरून वाद झाला. आरोपी जहागीर पटेल, शाहरूख खान, शे. अन्सार, शे. इमरान, शे. इरफान, शे. इरशाद (सर्व रा. जेतवन नगर) यांनी तलवार, लोखंडी पाइपने मो. इरफान, मरियम बी आणि मो. रहिम यांच्यावर हल्ला चढविला. यात तिघे जण गंभीर जखमी झाले. खदान पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

Web Title: Three attack with sword