सशस्त्र संघर्षप्रकरणी तीन आरोपींना अटक

By Admin | Updated: June 27, 2014 00:54 IST2014-06-27T00:54:36+5:302014-06-27T00:54:58+5:30

अकोला येथील मंगलदास मार्केटमध्ये झालेल्या सशस्त्र संघर्षप्रकरणी तीन आरोपींना अटक

Three accused arrested in armed conflict | सशस्त्र संघर्षप्रकरणी तीन आरोपींना अटक

सशस्त्र संघर्षप्रकरणी तीन आरोपींना अटक

अकोला- मंगलदास मार्केटमध्ये झालेल्या सशस्त्र संघर्षप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी तीन आरोपींना अटक केली. यापूर्वी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. मंगळवारी रात्री झालेल्या संघर्षात एकाची हत्या करण्यात आली होती.
टिळक रोडवरील मंगलदास मार्केटमध्ये मंगळवारी रात्री १२ वा.च्या सुमारास गवळीपुर्‍यात राहणारे शेख अक्रम शेख बुरहान नौरंगाबादी, शेख सलिम शेख बुरहान, शेख अली, महेबूब खान उर्फ मब्बासह काही जण उभे होते. यावेळी त्यांच्यावर विरुद्ध गटातील सहा जणांनी हल्ला केला. यावेळी मध्यस्थीसाठी गेलेल्या महेबूब खानवरही तलवारीने हल्ला करण्यात आला होता. हल्लय़ात शेख अक्रमचा खून झाला होता. पोलिसांनी गुरुवारी आरोपी शेख नईम शेख गफ्फूर, शेख फईम शेख गफ्फूर, शेख रशिद शेख सुलतान या तिघांना अटक केली.

Web Title: Three accused arrested in armed conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.