तहसीलदारांना दिली धमकी; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2016 02:03 IST2016-01-20T02:03:29+5:302016-01-20T02:03:29+5:30

तेल्हा-यात रेतीची अवैध वाहतूक; कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांना धमकी

Threat to Tehsildars; Filing a complaint | तहसीलदारांना दिली धमकी; गुन्हा दाखल

तहसीलदारांना दिली धमकी; गुन्हा दाखल

तेल्हारा: तालुक्यात रेतीची अवैध वाहतूक जोरात सुरू असून, कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांना धमकी दिल्याचा प्रकार सोमवारी पहाटे घडला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेल्हारा तालुक्यात रेती माफिया सक्रिय असून, मोठय़ा प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक सुरू आहे. त्यामुळे रेती माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी तेल्हारा तहसीलदार व त्यांच्या चमूने कारवाईचा बडगा उगारत आतापर्यंत रेतीची चोरटी वाहतूक करणार्‍या ३५ वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. त्यामुळे रेती माफियांचे पित्त खवळले.
दरम्यान, १८ जानेवारी रात्री मनतकार पेट्रोल पंपाजवळ एक नवीन विनाक्रमांकाचा ट्रक रेती वाहून नेत असल्याचे तहसीलदार सचिन पाटील, नायब तहसीलदार भारत किटे, मंडळ अधिकारी एम. जी. काळे, एम. टी. भोपळे, ओ. एम. वारुळकर यांच्या निदर्शनास आले. ट्रकमध्ये दोन ब्रास रेती होती. अधिकार्‍यांनी ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र चालक व मालकाने अधिकार्‍यांना धमकी दिली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे तहसीलदार पाटील यांनी मंगळवारी सकाळी तेल्हारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी ट्रकचालक सुदर्शन बोदडे व मालकाविरुद्ध भादंविचे कलम ३७९, ३५३, ५0६, ३४ अन्वये व गौण खनिज कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले. पुढील तपास ठाणेदार शे. अन्वर यांच्या मार्गदर्शनाखाली गणपत गवळी, नागोराव, भांगे करीत आहेत. तहसिलदारांनी पोलीसांना दिलेल्या तक्रारीमध्ये विकास पवार याच्याही नावाचा उल्लेख केला आहे.

Web Title: Threat to Tehsildars; Filing a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.