नायब तहसीलदारासह तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:19 AM2021-05-07T04:19:02+5:302021-05-07T04:19:02+5:30

अकोट तालुक्यातील पुंडा-बांबर्डा रस्त्यावर पोस्ट ऑफिसजवळ एका ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये रेती भरत असल्याची माहिती मिळाली. तहसील भरारी पथकाने घटनास्थळ गाठले. या ...

Threat to kill Talatha along with Deputy Tehsildar: Crime filed against both | नायब तहसीलदारासह तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नायब तहसीलदारासह तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next

अकोट तालुक्यातील पुंडा-बांबर्डा रस्त्यावर पोस्ट ऑफिसजवळ एका ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये रेती भरत असल्याची माहिती मिळाली. तहसील भरारी पथकाने घटनास्थळ गाठले. या ठिकाणी ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये अवैध रेती असल्याचे आढळून आल्यावरून पंचनामा करण्यात आला. यावेळी वाहन चालक-मालक याला ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला नेत, असताना, त्यांनी नायब तहसीलदार हरीश गुरव, तलाठी आर.ए. खामकर यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. पथकातील तलाठी राम लंगोटे यांची कॉलर पकडून धक्काबुक्की करून खाली पाडले आणि रेतीसह ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन पळून गेले. याप्रकरणी दहिहांडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. याप्रकरणी आरोपी मनोज लक्ष्मण पुंडकर, गजानन रमेश वाकोडे, रा. पुंडा यांच्या विरुद्ध भादंवि कलम ३५३, ३७९, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात रेती या गौण खनिजाची अवैध विक्री व वाहतूक सुरू असल्याचे घटनेवरून स्पष्ट होत आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर जात असल्याने चिंतेचा विषय झाला आहे.

Web Title: Threat to kill Talatha along with Deputy Tehsildar: Crime filed against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.