शहरं
Join us  
Trending Stories
1
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
2
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
3
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
4
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
5
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
6
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
7
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
8
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
9
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
10
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
11
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
12
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
13
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
14
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
15
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
16
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
18
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
19
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
20
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

निवडणुकीत ‘नापासांचा’ ईव्हीएम विरोधात मोर्चा;  मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर प्रहार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 12:05 PM

निवडणुकीत जनतेने नापास केलेल्या विरोधकांनी आता ईव्हीएम विरोधात मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. हा मोर्चा ‘नापासांचा’ मोर्चा असेल, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

अकोला: ज्या ईव्हीएमच्या भरवशावर काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसने आतापर्यंत सर्वच सत्ता उपभोगली त्याच ईव्हीएम विरोधात आता त्यांनी ओरड सुरू केली आहे. सुप्रिया सुळे बारामतीत जिंकल्या तर ईव्हीएम चांगले अन्यथा नाही, असा त्यांचा दुटप्पी खाक्या असून, निवडणुकीत जनतेने नापास केलेल्या विरोधकांनी आता ईव्हीएम विरोधात मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. हा मोर्चा ‘नापासांचा’ मोर्चा असेल, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने ते मंगळवारी अकोल्यात आले होते. येथील अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर आयोजित सभेत त्यांनी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा देतानाच विरोधकांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, विरोधी पक्षांचे नेते जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी मुजोरी केली, त्यामुळेच जनतेने त्यांना घरी बसविले आहे. आता जनतेकडे जाण्यासाठी त्यांच्याकडे मुद्दे नाहीत त्यामुळे त्यांनी ईव्हीएमच्या विरोधात ओरड सुरू केली आहे. विरोधकांनी जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष केला पाहिजे, ती त्यांची जबाबदारी आहे. जनतेच्या प्रश्नांवर मोर्चा काढला पाहिजे; मात्र ते ईव्हीएमला दोष देत मोर्चा काढत आहेत. हा प्रकार म्हणजे नापास झालेल्या विद्यार्थ्याने पेनाला दोष देण्यासारखे आहे, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेस पक्षाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्यांना अध्यक्षच मिळत नाही. त्यांनी मुंबईत गेटवे आॅफ इंडियावर उभे राहावे, तेथून चिठ्ठी टाकावी. ज्याच्या हाती लागेल त्याला अध्यक्ष करावे, असा उपहासात्मक सल्लाही दिला. राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या गळती सुरू झाली आहे. या पक्षाचे नेते शरद पवार सर्वांना पक्षातच थांबा, असे सांगतात; मात्र कोणीही थांबायला तयार नाही. त्यांचा पक्ष हे बुडते जहाज आहे. सर्वच नेते आता पटापट उड्या मारत आहेत, अशी टीका त्यांनी केली. विरोधांचा खरपूस समाचार घेतानाच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशात सुरू झालेल्या विकास पर्वाची प्रशंसा करून राज्यात झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा त्यांनी मांडला. काश्मीरसंदर्भात केंद्र सरकाराने घेतलेल्या भूमिकेमुळे आता प्रत्येक नागरिकाची छाती ५६ इंचाची झाली आहे. ‘गर्व से कहो काश्मीर हमारा है’ असा नारा त्यांनी दिली. यावेळी मंचावर कामगार मंत्री डॉ. संजय कुटे, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार सूरजसिंह ठाकूर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, महापौर विजय अग्रवाल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव पाटील, किशोर मांगटे उपस्थित होते.

 

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEVM Machineएव्हीएम मशीन