शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आठवीच्या विद्यार्थ्यांपेक्षा तिसरी, पाचवीतील विद्यार्थी सरस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:12 IST

अकोला : केंद्र शासनाच्यावतीने संपूर्ण देशामध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर २0१७ मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्यात आला असून, यात अकोला जिल्हय़ातील शालेय विद्यार्थ्यांची कामगिरी वाखणण्यासारखी नसली, तरी समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्दे१७३ शाळांमध्ये अचिव्हमेंट सर्वेक्षण राज्यातून जिल्हा ३0 व्या स्थानावर

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्र शासनाच्यावतीने संपूर्ण देशामध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर २0१७ मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्यात आला असून, यात अकोला जिल्हय़ातील शालेय विद्यार्थ्यांची कामगिरी वाखणण्यासारखी नसली, तरी समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हय़ातील शाळांमध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कशी आहे. त्यांचे कोणत्या विषयामध्ये किती ज्ञान आहे. हे तपासण्यासाठी विद्या प्राधिकरण पुणेमार्फत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने अकोला जिल्हय़ातील १७३ शाळांमध्ये हे सर्वेक्षण केले. इयत्ता तिसरी व पाचवीच्या प्रत्येकी ६१ आणि आठवीच्या ५१ शाळांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान इयत्ता तिसरीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची परिसर अभ्यास (इव्हीएस), मराठी भाषा, गणित विषयाची चाचणी घेण्यात आली. तसेच इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांची परिसर अभ्यास,  मराठी भाषा, गणित विषयाची, तर इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांची विज्ञान, मराठी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्र विषयातील चाचणी घेण्यात आली. यात इयत्ता तिसरी, पाचवीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कौतुकास्पद नसली, तरी समाधानकारक असल्याचे दिसून आले. परंतु जिल्हय़ातील इयत्ता आठवीतील विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीत बरेच माघारले असल्याचे दिसून आले. त्यामुळे आठवीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज असल्याचे या सर्वेक्षणाच्या आधारे मिळालेल्या टक्केवारीतून दिसून येत आहे. 

केंद्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी विद्या प्राधिकरणांतर्गत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने जिल्हय़ातील १७३ शाळांमधील इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांंचे सर्वेक्षण घेतले. या सर्वेक्षणात तिसरी, पाचवीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक आहे.  आठवीतील विद्यार्थ्यांंची गुणवत्ता खालावलेली असून, ही गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. - सागर तुपे, जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण

टॅग्स :Akola cityअकोला शहरeducationशैक्षणिकSchoolशाळाStudentविद्यार्थी