सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरवाढीविराेधात सेनेचे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 19:59 IST2021-06-27T19:58:56+5:302021-06-27T19:59:27+5:30
Shiv sena agitation : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुतळ्याचे दहन व रास्ता रोको करण्यात आले.

सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरवाढीविराेधात सेनेचे आंदाेलन
अकाेला : इंधन दरवाढीच्या विराेधात शिवसेनेने सलग तिसऱ्या दिवशी आंदाेलन केले. स्थानिक डाबकी रोड गजानन महाराज मंदिर येथे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुतळ्याचे दहन व रास्ता रोको करण्यात आले. या आंदोलनामध्ये राजेश मिश्रा, अतुल पवणीकर, तरुण बगेरे, संतोष अनासने, नितीन मिश्रा, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, शरद तुरकर, बबलू उके, सुरेंद्र विसपुते, किरण एलवनकार, योगेश गीते, रूपेश ढोरे, महिला आघाडी शुभांगी किंगे, वर्षा पिसोडे, मंजूषा शेडके, सुनीता श्रीवास, नीलिमा तिजारे, हरने ताई, मुन्ना भाऊ मिश्रा, संतोष रणपिसे, कुणाल शिंदे, योगेश अग्रवाल, संजू अग्रवाल, अश्विन नवले, कुणाल शिंदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, तसेच महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.