मारहाण करून दुचाकी पळविणार्या चोरट्यास कोठडी
By Admin | Updated: June 24, 2017 05:52 IST2017-06-24T05:52:06+5:302017-06-24T05:52:06+5:30
मारहाण करून बळजबरीने दुचाकी पळविणार्या चोरट्यास सिव्हिल लाइन पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

मारहाण करून दुचाकी पळविणार्या चोरट्यास कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मारहाण करून बळजबरीने दुचाकी पळविणार्या चोरट्यास सिव्हिल लाइन पोलिसांनी गुरुवारी अटक केली. चोरट्यास न्यायालयात हजर केले. त्याला २५ जूनपर्यंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
कासली येथे राहणारे गणेश सारंगधर काळमेघ यांच्या तक्रारीनुसार, ११ जून रोजी दुपारी ३ वाजता ते खरप गावाजवळील पंचशील नगरातून जात असताना आरोपी सुहास सुरेश वाकोडे व त्यांच्या दोन साथीदारांनी त्यांना अडविले आणि मारहाण करून त्यांच्याकडील एमएच ३0 एडब्लू ७२९७ क्रमांकाची दुचाकी बळजबरीने पळवून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी सुहास वाकोडे यास अटक केली.