शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ रक्तदान करून जपतात ‘जिव्हाळा’; रक्तदानासाठी १२००सदस्य २४ तास तत्पर

By atul.jaiswal | Updated: October 1, 2018 12:10 IST

केवळ रक्त नसल्यामुळे कोणाचे प्राण जाऊ नये, या उद्दात्त हेतूने अकोल्यात रक्तदात्यांची एक फळीच तयार झाली असून, यासाठी ‘जिव्हाळ्याचे रक्तदाते’ हा ग्रुप तयार करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअकोल्यातील काही तरुणांनी समोर येऊन १३ आॅगस्ट २०१६ रोजी ‘जिव्हाळ्याचे रक्तदाते’ हा ग्रुप स्थापन केला. रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास या ग्रुपमधील सदस्य मदतीसाठी धावून येतात. ग्रुपच्या सदस्यांनी दोन व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार केले असून, या गु्रपवर माहितीचे आदान-प्रदान केले जाते.

- अतुल जयस्वालअकोला : रक्तदानाबाबत अजूनही पुरेशी जागृती नसल्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा ही नित्याचीच बाब झाली आहे. केवळ रक्त नसल्यामुळे कोणाचे प्राण जाऊ नये, या उद्दात्त हेतूने अकोल्यात रक्तदात्यांची एक फळीच तयार झाली असून, यासाठी ‘जिव्हाळ्याचे रक्तदाते’ हा ग्रुप तयार करण्यात आला आहे.रक्ताला पर्याय नसल्यामुळे मनुष्याला लागणाऱ्या रक्ताची पूर्तता केवळ मानवी रक्तानेच होऊ शकते. शस्त्रक्रिया, अपघात, सिझेरियन, थॅलेसिमिया, सिकलसेल आदी आजारांमध्ये रक्ताची नितांत गरज भासते. शासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा नेहमीच तुटवडा असतो. एखाद्याला गरज भासली, तर ‘डोनर’शिवाय पर्याय नसतो. अनेकदा रक्त नसल्यामुळे रुग्णाला प्राणही गमवावा लागतो. या सर्वांवर मात करण्यासाठी अकोल्यातील काही तरुणांनी समोर येऊन १३ आॅगस्ट २०१६ रोजी ‘जिव्हाळ्याचे रक्तदाते’ हा ग्रुप स्थापन केला. बघता-बघता या ग्रुपसोबत १२०० रक्तदाते जुळले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय किंवा शहरातील कोणत्याही खासगी इस्पितळात दाखल असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास या ग्रुपमधील सदस्य मदतीसाठी धावून येतात. ग्रुपच्या सदस्यांकडून रक्तदान शिबिरांचेही आयोजन केले जाते.

व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर होते आदान-प्रदानया ग्रुपच्या सदस्यांनी दोन व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार केले असून, या गु्रपवर माहितीचे आदान-प्रदान केले जाते. एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज असल्यास ग्रुपमधील सदस्य रुग्णाचे नाव, तो कोठे भरती आहे, रक्तगट कोणता, याबाबत ग्रुपवर माहिती टाकतात. संबंधित रक्तगट असलेला ग्रुपमधील सदस्य त्याची दखल घेऊन रक्तदान करतो.यावर्षी वाचविले ७०० जणांचे प्राण!ग्रुपमधील सदस्य २४ तास रक्तदानासाठी तयार असतात. तीन महिन्यांतून एकदा रक्तदान करता येते. रक्तदात्यांची मोठी फळी असल्यामुळे ‘डोनर’ नेहमीच उपलब्ध असतात. ग्रुपमधील सदस्यांनी केलेल्या रक्तदानामुळे यावर्षी ७०० जणांचे प्राण वाचविता आल्याची माहिती ग्रुपचे समन्वयक पवन डांबलकर यांनी दिली. या ग्रुपमध्ये आशिष कसले, आशिष सावळे, निशिकांत बडगे, विपुल माने, निखिल साबळे, मोहन लुले यांच्यासह सर्वच सदस्य सक्रिय असतात.

 

टॅग्स :AkolaअकोलाBlood Bankरक्तपेढीhospitalहॉस्पिटल