सीबीएसई दहावीत यंदा एकही विद्यार्थी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:31 IST2021-02-06T04:31:47+5:302021-02-06T04:31:47+5:30
अकोला : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल बाेर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने आनंदाची बातमी दिली आहे. सीबीएसईच्या नव्या नियमानुसार विद्यार्थी ...

सीबीएसई दहावीत यंदा एकही विद्यार्थी होणार
अकोला : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल बाेर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने आनंदाची बातमी दिली आहे. सीबीएसईच्या नव्या नियमानुसार विद्यार्थी खराेखर गुणवान असेल तर आता त्यांचं एक वर्ष वाया जाणार नाही. या निर्णयाबाबत पालकांची मते जाणून घेतली असता, त्यांनी या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. नव्या नियमानुसार एकही विद्यार्थी नापास होणार नाही. हे चांगले असले तरी परीक्षेच्या माध्यमातून अभ्यासक्रमाच्या आधारेच मूल्यांकन व्हायला हवे, असे पालकांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात सीबीएसई पॅटर्नच्या एकूण ११ शाळा आहेत. यामध्ये एकूण ८२७ विद्यार्थी आहेत. काेराेनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये याकरिता सीबीएसई बाेर्डाने घेतलेल्या निर्णयाबाबत पालकांशी चर्चा केली असता, काही पालकांनी स्वागत केले, तर काहींनी नाराजी व्यक्त केली. पालकांनी परीक्षेच्या आधारावरच विद्याथ्यार्थ्यांचे मूल्यांकन करून त्यांना गुण द्यावे. चांगले गुण असेल तरच चांगले करिअर निवडण्याची संधी मिळते, तर काही पालकांनी या निर्णयाचे स्वागत करून सीबीएसईने चांगला निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
काय आहे नवा नियम
सीबीएसई बोर्डाच्या निर्णयानुसार दहावीच्या परीक्षेत पास की नापास हे ठरविण्यासाठी परीक्षेच्या सर्व विषयांपैकी फक्त पाच विषय ज्यात सर्वाधिक गुण मिळाले आहेत, त्यांचा विचार केला जाईल. या पाच विषयांत पास म्हणजे दहावीत पास अशी व्यवस्था असेल. तसेच दहावीची परीक्षा देणाऱ्यांसाठी पर्यायी विषय म्हणून कौशल्य विकास अभ्यासक्रम असेल.
केवळ पाच विषयांचा नव्हे तर सर्व विषयांचा विचार सीबीएसईने केला पाहिजे. चांगले गुण मिळाले तर उत्तम करिअर निवडता येईल. अभ्यासक्रम कमी करून सीबीएसईने विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा.
गजानन धोत्रे, पालक
पाच विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळाले तर पास, नापास ठरणार आहे. याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम व्हायला नको. वर्षभर अभ्यास करणाऱ्या गुणवंत विद्याथ्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये असे वाटते. त्यांना योग्य गुण मिळायला हवेत.
वैशाली कट्यारमल, पालक
दहावीच्या सर्व विषयांपैकी पाच विषयांमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरविली जाणार आहे. हा चांगला निर्णय आहे. कौशल्य विकास हा पर्यायी विषयसुद्धा दिला आहे. एकही विद्यार्थी नापास होणार नाही. याकडे लक्ष दिले आहे. ही चांगली बाब आहे.
शशिकांत कुळकर्णी, प्राचार्य ज्युबिली सीबीएसई हायस्कूल कुंभारी
एकूण शाळा
११
विद्यार्थी संख्या
८२७