शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

रोहयोतून शेतरस्त्यांसाठी निधीच दिला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 4:03 PM

अकोला, बाळापूर तालुक्यातील १ कोटी २० लाखांचा निधी अद्याप मिळालेला नाही.

अकोला: महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या राज्यातील विविध कामांवर असलेल्या मजुरांची मजुरी काही प्रमाणात अदा केल्यानंतर आता कुशल कामांचा निधी मिळण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागणी केल्यानंतरही अकोला, बाळापूर तालुक्यातील १ कोटी २० लाखांचा निधी अद्याप मिळालेला नाही.शासनाच्या आकडेवारीनुसार राज्यात मजुरी आणि साहित्यापोटी ३४ जिल्ह्यांत योजनेच्या कामासाठी लागणाºया साहित्याच्या मोबदल्यापोटी देय असलेला २९७ कोटी ७७ लाखांपेक्षाही अधिक निधी थकीत आहे. मार्च २०१९ अखेरपर्यंत वाढच झालेली आहे. त्यामध्ये कामगारांची मजुरी, कुशल कामांच्या साहित्याच्या देयकांचा समावेश आहे. दोन वर्षांपासून एकही देयक शासनाकडून अदा होत नसल्याने ग्रामपंचायती, काम करणारे, तसेच साहित्याचे पुरवठादार कमालीचे अडचणीत आहेत. शेतरस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.रोजगार हमी योजना आयुक्तांनी घेतलेल्या आढाव्यात राज्यात २४,४३७ शेतरस्त्यांची कामे सुरू आहेत. त्या रस्त्यांच्या कुशल देयकापोटी १२ कोटी ५ लाख २४ हजार रुपये निधीची गरज आहे. त्या कामांचा निधी मिळण्यासाठी २४ मुद्यांची माहिती प्रपत्रात भरून द्यावी, असे निर्देश आयुक्तांनी डिसेंबर २०१८ मध्येच दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील दोनच तालुक्यांनी ती माहिती प्रपत्रात सादर केली. त्यामध्ये अकोला तालुक्यात ३८ रस्त्यांच्या कामासाठी ८९ लाख ८० हजार रुपये तर बाळापूर तालुक्यात १३ रस्त्यांच्या कामासाठी १९ लाख २० हजार रुपये निधीची मागणी आहे. हा निधी तातडीने द्यावा, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जूनमध्ये दिलेल्या प्रस्तावात केली. त्यावर अद्यापही निधी मिळाला नसल्याची माहिती आहे. शेतरस्त्यांकडे दुर्लक्ष, इतर कामांना प्राधान्यरोजगार हमी योजना विभागाने अंतर्गत रस्ते, सिमेंट रस्ते कामांचा समावेश केल्यानंतर शेतरस्त्यांची कामे मागे पडली आहेत. त्याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये ही कामेच सुरू झालेली नाहीत. त्यातून शेतीसाठी उपयुक्त ठरणाºया या उपक्रमांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. ती कामे तातडीने सुरू करण्याची मागणीही होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद