अर्थसंकल्पात सहकारासाठी खूप अपेक्षा होती- राधेश्याम चांडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 18:02 IST2022-02-01T18:02:44+5:302022-02-01T18:02:53+5:30
Radheshyam Chandak on Union Budget : १८ टक्क्यांनुसार भरावा लागणारा कर आता १५ टक्क्यांवर आणल्या गेला आहे.

अर्थसंकल्पात सहकारासाठी खूप अपेक्षा होती- राधेश्याम चांडक
अकोला : यंदाच्या अर्थसंकल्पात सहकारासाठी खूप अपेक्षा होती; मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही, असे बुलडाणा अर्बन पतसंस्थाचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी म्हटले आहे.
अर्थसंकल्पात सरफेशी ॲक्टची अपेक्षा होती. सोबतच २६९ एसएस आणि २६९ एसटी या कायद्याबद्दल स्पष्टीकरणही आलेले नाही. सहकारीसाठी विशेष असे काही नाही. केवळ सहकार क्षेत्राला करामध्ये थोडासा दिलासा मिळाला आहे. सहकार क्षेत्राला १८ टक्क्यांनुसार भरावा लागणारा कर आता १५ टक्क्यांवर आणल्या गेला आहे. सोबतच को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या उत्पन्नाच्या आधारावर १२ टक्क्यांऐवजी कर आता ७ टक्क्यांवर आणला ऐवढीच काय ती जमेची बाब म्हणता येईल. नाही म्हणायला यंदाच्या अर्थसंकल्पात शेती बऱ्यापैकी कव्हर