There is no new 'Corona' suspect; Another report 'Negative'! | CoronaVirus in Akola : एकही नवीन संशयित नाही; आणखी एकाचा अहवाल ‘निगेटिव्ह’!

CoronaVirus in Akola : एकही नवीन संशयित नाही; आणखी एकाचा अहवाल ‘निगेटिव्ह’!

ठळक मुद्देआतापर्यंत कोरोनाचे २७ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.शुक्रवारी एकही नवीन संशयित रुग्ण दाखल झाला नाही. आयसोलेशन कक्षात पाच संशयित रुग्ण दाखल.

अकोला: जिल्ह्यात कोरोनाचा एकही बाधित रुग्ण नाही. शुक्रवारी आणखी एकाचा वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आला असून, एकही नवीन संशयित दाखल झाला नाही. अकोलेकरांसाठी ही दिलासा देणारी बातमी असली, तरी खबरदारी राखणे अत्यावशक आहे.
सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात आतापर्यंत कोरोनाचे २७ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी २२ रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी चार संशयित रुग्ण दाखल झाल्याने चिंतेचे वातावरण होते; पण शुक्रवारी एकही नवीन संशयित रुग्ण दाखल झाला नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. त्यामुळे सध्या आयसोलेशन कक्षात पाच संशयित रुग्ण दाखल असून, गुरुवारी सकाळीच त्यांचे वैद्यकीय चाचणीचे नमुने नागपूरला पाठविण्यात आले.

Web Title: There is no new 'Corona' suspect; Another report 'Negative'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.