बसस्थानकात व्हीलचेअरच नाही; दिव्यांग, ज्येष्ठांची कसरत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:18 IST2021-02-05T06:18:42+5:302021-02-05T06:18:42+5:30
अकाेला : राज्यातील काही आगारांमध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सोईसाठी ‘व्हीलचेअर’ ठेवण्यात आल्या आहेत; मात्र जिल्ह्यातील एकाही आगारात ही ...

बसस्थानकात व्हीलचेअरच नाही; दिव्यांग, ज्येष्ठांची कसरत!
अकाेला : राज्यातील काही आगारांमध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सोईसाठी ‘व्हीलचेअर’ ठेवण्यात आल्या आहेत; मात्र जिल्ह्यातील एकाही आगारात ही व्यवस्था अद्याप उभारण्यात आलेली नाही. यासह बसस्थानकात पायऱ्या चढ-उतार करताना रॅम्पचीही व्यवस्था नसल्यामुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्य एस.टी. परिवहनच्या स्थानकांमध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना ‘व्हीलचेअर’ आणि इतर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. दिव्यांगांना स्थानकात सहज प्रवेश करता यावा, यासाठी प्रामुख्याने जिल्हा मुख्यालय स्थानकाच्या प्रवेशद्वारात उताराची आणि त्याच्याकडेने रेलिंगची व्यवस्था उभी व्हायला हवी. याशिवाय प्रसाधनगृहात अशा व्यक्तींकरिता शौचालयांमध्ये किमान कमोड असायला हवे. बसस्थानकांमध्ये दिव्यांगासाठी ‘व्हीलचेअर’ उपलब्ध असणे गरजेचे आहे; मात्र यातील एकही सुविधा जिल्हा मुख्यालयी, बसस्थानकांमध्ये उपलब्ध नसल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले.
.........................
बसस्थानकातून दररोज ये-जा करणाऱ्या बसेसची संख्या - २०६
रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या -१०००
................
बॉक्स :
व्हीलचेअर अद्याप मिळाल्याच नाहीत
अकाेला आगाराला अद्यापपर्यंत वरिष्ठ पातळीवरून व्हीलचेअर मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ही व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध झाली नाही; तर स्थानकात ये-जा करण्याच्या ठिकाणी व स्वच्छतागृहांच्या पायऱ्यांवर रॅम्प उभारण्याकडे आगाराने लक्ष पुरविले नाही.
.........................
कोट :
अकाेला आगार हे पश्चिम वऱ्हाडातील सर्वात माेठे आगार आहे. येथे असलेल्या आराेग्य सुविधांमुळे परिसरातील रुग्णांचा माेठा राबता असताे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचीही संख्या माेठी आहे त्यामुळे या ठिकाणी तरी सर्व सुविधा मिळायला हव्यात.
- बाबूसिंग चव्हाण
ज्येष्ठ नागरिक
....................
दिव्यांगांसाठी बसस्थानकात काेणत्या सुविधा असतात याची माहिती अनेक दिव्यांगांना नाही त्यामुळे स्थानकावर दिव्यांगांसाठी काेणत्या सुविधा दिल्या जातात याचा फलक स्थानकात लावणे गरजेचे आहे.
रवींद्र बाहेकर,
दिव्यांग