मनपाचे लाेका सांगे ब्रम्हज्ञान; सामान्यांवर कारवाई, कर्मचारी मास्कविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:24 IST2021-02-26T04:24:47+5:302021-02-26T04:24:47+5:30

शहरात काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याची बाब लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने १५ फेबुवारीपासून शहरासह ...

Theology of the Corporation; Action on commons, without employee masks | मनपाचे लाेका सांगे ब्रम्हज्ञान; सामान्यांवर कारवाई, कर्मचारी मास्कविनाच

मनपाचे लाेका सांगे ब्रम्हज्ञान; सामान्यांवर कारवाई, कर्मचारी मास्कविनाच

शहरात काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याची बाब लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने १५ फेबुवारीपासून शहरासह जिल्ह्यात जमावबंदी लागू केली. शहरात काेराेनाच्या नियमांचे नागरिकांकडून सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे पाहून महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी मास्क न लावणाऱ्या व साेशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविराेधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यासाठी मनपा, पाेलीस व महसूल प्रशासनाच्या संयुक्त पाच पथकांतर्फे कारवाई केली जात आहे.

५८ हजारांचा दंड वसूल

१५० नागरिक आणि सहा व्यावसायिकांकडून महापालिकेने बुधवारी ५८ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. या वेळी परवानगीशिवाय दुकान सुरू ठेवणाऱ्या टिळक राेडवरील दाेन दुकानांना सील लावण्याची कारवाई करण्यात आली.

मनपाचे प्रभारी आयुक्त डाॅ. पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत केलेल्या पथकाने बुधवारी ताेंडाला मास्क न लावणाऱ्या १५० जणांना दंड आकारला. यामध्ये प्रत्‍येकी २०० रुपये दंड वसूल करण्यात आला असून, सोशल डिस्‍टन्सिंगचे उल्‍लंघन करणाऱ्या सहा व्‍यावसायिकांना दंड आकारण्यात आला आहे. या वेळी अकाेलेकरांकडून एकूण ५८ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

Web Title: Theology of the Corporation; Action on commons, without employee masks