चोरीचा संशय; युवकांना मारहाण

By Admin | Updated: June 2, 2015 02:09 IST2015-06-02T02:09:24+5:302015-06-02T02:09:24+5:30

बाळापूर तालुक्यातील घटना; पाठलाग करून व्हॅनची केली तोडफोड.

Theft suspected; The youth beat up | चोरीचा संशय; युवकांना मारहाण

चोरीचा संशय; युवकांना मारहाण

व्याळा/बाळापूर : चोरीच्या संशयावरून बोराळा-बोरवाकळी येथील काही ग्रामस्थांनी युवकांना मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री व्याळा पेठमध्ये घडली. मारहाणीत एक युवक गंभीर जखमी झाला आहे. यावेळी जमावाने व्हॅनची तोडफोड केली. पारस येथील अब्दुल रशिद अ. मजिद आणि शे. वसिम शे. मुश्ताक हे दोघे एमएच-३0-एए-२१८६ क्रमांकाच्या व्हॅनने निमकर्दा मार्गे बोराळा-बोरवाकळीकडे निघाले. बोराळाजवळ दुचाकीस्वार ग्रामस्थांना चोरीचा संशय आल्याने त्यांनी व्हॅन अडविण्याचा प्रयत्न केला; मात्र व्हॅन थांबली नाही. व्हॅनमधील युवकही घाबरले. ते रेल्वे गेटकडे वळले. दुचाकीस्वारांनी शेतरस्त्यामार्गे व्हॅनला बोराळा-बोरवाकळी ते व्याळा दरम्यान गाठले. दुचाकीस्वारांनी व्हॅनमधील युवकांना मारहाण केली. यात एक जखमी झाला. त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बाळापूरचे ठाणेदार घनश्याम पाटीलसह पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. सध्या परिसरातील शांतता आहे.

Web Title: Theft suspected; The youth beat up