शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

मूर्तिजापूर तालुक्यातील 'रेस्ट हाऊस'ची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 4:02 PM

The rest house in Murtijapur taluka deserted : एका रेस्ट हाऊस मध्ये चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाने आपले कार्यालयच थाटले आहे.

-संजय उमकलोकमत न्यूज नेटवर्क

मूर्तिजापूर : शहरासह तालुक्यात ४ रेस्ट हाऊस ची निर्मिती ६० ते १०० वर्षापूर्वी करण्यात आली होती त्यापैकी एक निरिक्षण कुटी तयार करण्यात आली होती कालांतराने या कुटीचा रेस्ट हाऊस म्हणून उपयोग करण्यात येत असे, तर ५ रेस्ट हाऊस ची उभारणी करण्यात आली होती त्या पैकी  गाजीपुर निरीक्षण कुटी सह सर्व ५ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत  असल्याची माहिती आहे. या ५ पैकी ४ ओस पडले असून ३ रेस्ट हाऊसची दुरवस्था झाली आहे आणि एका रेस्ट हाऊस मध्ये चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाने आपले कार्यालयच थाटले आहे.              शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशस्त असे दोन रेस्ट हाऊस आहेत, येथील क्रमांक १ च्या रेस्ट हाऊस  सन १९५९-६० च्या दशकात निर्मिती २ हजार १५५ स्क्वेअर मीटर क्षेत्रात व क्रमांक २ रेस्ट हाऊस  १९१८-१७ साली २ हजार १०२ स्क्वेअर मीटर क्षेत्रात उभारण्यात आले होते. गाजीपुर येथे काटेपूर्णा नदीवरील पुल बांधकामा दरम्यान १९६० मध्ये त्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी तेथे एक निरिक्षण कुटी तयार करण्यात आली होती, कालांतराने त्या कुटीचा 'रेस्ट हाऊस' म्हणून वापर करण्यात येत होता, आजच्या स्थितित ही वास्तू भग्नावस्थेत आहे, हिवरा कोरडे (बल्लारखेड) व धोत्रा शिंदे येथे एक रेस्ट हाऊस आहे परंतु हे रेस्ट हाऊस अनेक वर्षांपासून बंद असल्याने त्याची दैनंदिन अवस्था झाली असल्याने संपूर्ण मोडकळीस आले असून केवळ त्याचे अवशेष तिथे बाकी आहेत. शहरातील क्रमांक १ च्या रेस्ट हाऊस अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने त्याची डागडुजी करुन त्यात सार्वजनिक विभागाने आपले कार्यालय थाटले आहे तर क्रमांक २ च्या रेस्ट हाऊसची तिच स्थिती असून केवळ नावापुरतेच चालू असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग