शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीचे नाव समजले, कारवाई होणार; गृहमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 07:24 IST

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी अकोल्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

अकोला : जुने शहरातील हरिहरपेठ परिसरात शनिवारी रात्री घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी अकोल्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.रविवारी सकाळी ११ वाजता जुने शहर पोलिस ठाण्यात सर्वपक्षीय शांतता समितीची बैठक पार पडली. जुने शहर परिसरातील संचारबंदी व शहरातील तणावाचे वातावरण लक्षात घेता छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्तची शोभायात्रा व अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आले. दुपारी पालकमंत्री फडणवीस यांचे प्रतिनिधी गिरीश महाजन यांनी परिस्थितीची माहिती घेतली. शांतता समितीच्या बैठकीनंतर अधिकाऱ्यांसह आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार नितीन देशमुख, आमदार अमोल मिटकरी आदींनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

पोस्ट टाकणाऱ्यावर कारवाई करू!समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर आले असून, संबंधित व्यक्तीवर निश्चितपणे कारवाई करण्यात येणार आहे. गरज पडल्यास या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचेही महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

एसआरपी, आरसीपीच्या तुकड्या तैनातशहरातील जुने शहर भागात सशस्त्र पोलिस बल, राज्य राखीव पोलिस बलाच्या ४ तुकड्या आणि आरसीपीच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, सहा. पोलिस निरीक्षक, पीएसआय, एएसआयसह वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि हिंगोली येथील एक हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे. दगडफेक, जाळपोळ करणाऱ्यांची गय केली जाणार नसून, सूत्रधारांचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक घुगे यांनी सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाHome Ministryगृह मंत्रालयMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस