शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वंचित, एमआयएमने काँग्रेसची वाट केली 'बिकट'! महापालिका निवडणुकीत आमदाराचा लागणार 'कस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:46 IST

Akola Municipal Election 2026: अकोला महापालिकेची निवडणुकी काँग्रेससाठी जड जाताना दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी न झाल्याने आंबेडकरांचा पक्ष स्वबळावर उतरला आहे. तर दुसरीकडे एमआयएममुळे मतविभाजनाची चिंताही वाढली आहे.

-सदानंद सिरसाट, अकोलाअकोला शहरासह जिल्ह्यात अस्तित्व टिकविण्यासाठी गत अनेक वर्षापासून झगडत असलेल्या काँग्रेसला अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विजयामुळे थोडे बळ मिळाले असताना, महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत न होऊ शकलेली युती आणि नगरपालिका निवडणुकांतील यशामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाने तब्बल ३८ मजलीस-ए-इत्तेहादूल उमेदवार रिंगणात उतरवल्याने कॉग्रेसची वाट बिकट झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये सात नगरसेवक आणि अकोटात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्याने एमआयएम पक्षाचा आत्मविश्वास दुणावला असून, पक्षाने अकोला महापालिका निवडणुकीत उत्साहाने उडी घेतली आहे. 

काँग्रेसचा पारंपरिक मतदार एमआयएमकडे आकृष्ट होत असल्याने, आता एमआयएमची घोडदौड रोखणार कशी, या चिंतेने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ग्रासल आहे. त्यांच्या चिंतेत भर घालत, वंचित बहुजन आघाडीही स्वबळावर रिंगणात आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांना बोचऱ्या थंडीतही घाम फुटू लागला आहे.

नगरपरिषदांच्या निवडणुकांत एमआयएमने डोळ्यात भरेल, असे यश मिळवले. अकोटमध्ये एमआयएमचे ५, तर काँग्रेसचे ६ नगरसेवक विजयी झाले. तर बार्शिटाकळी, हिवरखेडमध्येही प्रत्येकी एक नगरसेवक आहे.

आमदारावर जबाबदारी

काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी संबंधित आमदारांवर सोपवली आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका निवडणुकीत अकोला पश्चिमचे आमदार साजिदखान पठाण यांची कामगिरी कशी होते, यावरच त्यांचे पक्षातील वजन ठरणार आहे.

'वंचित'चाही फरक पडणार

वंचित बहुजन आघाडीचे नगरपरिषद निवडणुकांमध्ये एक नगराध्यक्ष आणि १७नगरसेवक विजयी झाले आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे २० नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला समविचारी मानले जाते आणि उभय पक्षांची मतपेढी समान आहे.

एमआयएमचा मतपेढीवर निशाणा

एमआयएमने काँग्रेसची पारंपरिक मतपेढी असलेल्या आठही प्रभागांत ३२ उमेदवार दिले आहेत. प्रभाग क्रमांक १,२,७,८,९,११,१७,१८ मध्ये एमआयएम आणि काँग्रेसने चारही जागांवर उमेदवार दिले आहेत. 

एमआयएमने प्रभाग क्रमांक १४ व १६ मध्ये अनुक्रमे तीन आणि दोन उमेदवार दिले आहेत. प्रभाग १४ मध्ये काँग्रेसचे २ व एमआयएमचे ३, तर प्रभाग १६ मध्ये दोन्ही पक्षांचे अनुक्रमे १ व २ उमेदवार रिंगणात आहेत. त्यावरून एमआयएमने काँग्रेसच्या पारंपरिक मतपेढीला लक्ष्य केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

नगरपालिका निवडणुकांच्या पुनरावृत्तीची धास्ती !

अकोटात नगराध्यक्ष पदाच्या लढतीत एमआयएमच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. त्यामुळे काँग्रेसच्या पारंपरिक मतपेढीत एमआयएमने चांगलाच खड्डा पडल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत झाले आहे. आता महापालिका निवडणुकीतही नगरपालिका निवडणुकांची पुनरावृत्ती होते की काय, अशी धास्ती काँग्रेस पदाधिकाऱ्यांना वाटू लागली आहे.

टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Akola Municipal Corporation Electionअकोला महानगरपालिका निवडणूक २०२६congressकाँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन