पळवून नेलेल्या मुलीचा शोध घेऊन केले पालकांच्या स्वाधीन
By नितिन गव्हाळे | Updated: April 25, 2023 14:10 IST2023-04-25T14:09:56+5:302023-04-25T14:10:27+5:30
कुंभारी येथील एका पित्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या १७ वर्षीय मुलीस अज्ञात युवकाने फूस लावून पळवून नेले.

पळवून नेलेल्या मुलीचा शोध घेऊन केले पालकांच्या स्वाधीन
अकोला : एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत कुंभारी येथून १७ वर्षीय मुलीला अज्ञात युवकाने पळवून नेले होते. एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलीचा शोध घेतला. मोबाइल लोकेशनवरून मुलगी भौरद येथे असल्याचे समजल्यावरून पोलिसांनी अवघ्या १२ तासांमध्ये मुलीला ताब्यात घेतले.
कुंभारी येथील एका पित्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या १७ वर्षीय मुलीस अज्ञात युवकाने फूस लावून पळवून नेले. याप्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी २२ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला. पोलिसांनी भौरद परिसरातून मुलीला ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात आणून पालकांच्या समोर हजर केले. ही कारवाई एमआयडीसीचे ठाणेदार किशोर वानखेडे यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख एएसआय दयाराम राठोड, एएसआय जांभुळे, विजय अंभोरे, सतीश प्रधान, संतोष डाबेराव यांनी केली.