गावठी दारू अड्डय़ावर धाड; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 19:49 IST2017-08-27T19:48:09+5:302017-08-27T19:49:14+5:30
सोनाळा शेतशिवारात बोरगाव मंजू पोलिसांनी २७ ऑगस्ट रोजी विविध पाच ठिकाणी अवैधरीत्या सुरू असलेल्या गावठी हातभट्टी अड्डय़ावर धाड टाकून दोघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून १७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला, तर तिघे घटनास्थळावरून पसार झाले.

गावठी दारू अड्डय़ावर धाड; दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू : सोनाळा शेतशिवारात बोरगाव मंजू पोलिसांनी २७ ऑगस्ट रोजी विविध पाच ठिकाणी अवैधरीत्या सुरू असलेल्या गावठी हातभट्टी अड्डय़ावर धाड टाकून दोघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून १७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला, तर तिघे घटनास्थळावरून पसार झाले.
सोनाळा शेतशिवारात गावठी दारू काढण्यात येत असल्याची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन तास शोध मोहीम राबवून पाच ठिकाणी धाड टाकली. यावेळी भीमराव वानखडे, कैलास चव्हाण या दोघांना पोलिसांनी अटक केली, तर माणिक अंभोरे, विनोद उके, सुरज अंभोरे हे घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी यावेळी १७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई ठाणेदार पी. के. काटकर, बिट जमादार महादेवराव पवार, विष्णू ढोरे, प्रवीण वाकोडे, श्रीकांत वानखडे आदींनी केली. सोनाळा बंदीत वेगवेगळ्या ठिकाणी दहा किलोमीटर अंतरावरील घनदाट जंगला त पायदळ फिरून पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध बोरगाव मंजू पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दा खल केला आहे. पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.