खासदारांच्या घरासमोर ‘थाली बजाव’ आंदोलन

By Admin | Updated: July 28, 2014 01:40 IST2014-07-28T01:40:58+5:302014-07-28T01:40:58+5:30

अकोला शहरातील अतिक्रमणग्रस्त बेरोजगार कृती समितीचा सहभाग

Thali Bajwa movement in front of MP's house | खासदारांच्या घरासमोर ‘थाली बजाव’ आंदोलन

खासदारांच्या घरासमोर ‘थाली बजाव’ आंदोलन

अकोला : व्यवसाय करण्यासाठी पर्यायी जागा द्यावी व महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविताना साहित्याची तोडफोड करून नये, या मागण्यांसाठी अतिक्रमणग्रस्त बेरोजगार कृती समितीने रविवारी खासदारांच्या घरासमोर ह्यथाली बजावह्ण आंदोलन केले.
काही दिवसांपासून महापालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत रस्त्यालगत व्यवसाय करणार्‍या लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांची दुकाने हटविण्यात आली. पर्यायी जागा उपलब्ध न झाल्याने लघू व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लघू व्यावसायिकांनी यापूर्वी अनेक वेळा मनपा प्रशासनाशी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा केली. तसेच निवेदनही सादर केले. मात्र लघू व्यावसायिकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत.
दरम्यान, अतिक्रमण मोहिमेत हटविण्यात आलेल्या व्यवसायिकांनी अतिक्रमणग्रस्त बेरोजगार कृती समितीची स्थापना केली. कृती समितीनेही प्रशासनाशी चर्चा केली. मात्र यश आले नाही. त्यामुळे समितीने लोकप्रतिनिधींकडे मदत मागण्याचा निर्णय घेतला.
रविवारी सकाळी ८ वा.च्या सुमारास खा. संजय धोत्रे यांच्या घरासमोर कृती समितीने ह्यथाली बजावह्ण आंदोलन केले. सुमारे अर्धा तास आंदोलन करण्यात आले. आंदोलनात संदीप जोशी, नंदू ढोरे, सतीश देशमुख, राजू कनोजिया, भूपेंद्र अंबुसकर, काशीनाथ बाभूळकर, शिवलाल इंगळे, संजय तायडे यांच्यासह कृती समितीचे अनेक कार्यर्ते उपस्थित होते.

Web Title: Thali Bajwa movement in front of MP's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.