शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

अमित-प्रतीक्षा हत्याकांडाची मुख्य साक्ष आटोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 13:18 IST

राज्यभर गाजलेल्या या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणाची सुनावणी तब्बल ११ वर्षांनंतर प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आरलँड यांच्या न्यायालयात सुरू झाली असून, शुक्रवारी या प्रकरणातील दुसऱ्या मुख्य साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली.

अकोला - गायगाव रोडवरील बाराखोली परिसरात अमित-प्रतीक्षा यांना बांधून ठेवून मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर हत्याकांड करण्यात आले होते. राज्यभर गाजलेल्या या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणाची सुनावणी तब्बल ११ वर्षांनंतर प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आरलँड यांच्या न्यायालयात सुरू झाली असून, शुक्रवारी या प्रकरणातील दुसऱ्या मुख्य साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. पाच ते सहा तास या साक्षीदाराची तपासणी करण्यात आली.जुने शहरातील अमित आणि त्याची मैत्रीण प्रतीक्षा हे दोघे जण शिकवणी वर्ग आटोपल्यानंतर गायगाव रोडवरील बाराखोली परिसरात १४ जून २००८ रोजी दुचाकीने जात होते. अमित-प्रतीक्षा दोघेही बसलेले असताना मनिष श्रीकृष्ण खंडारे रा. डाबकी रोड, हुसेन खा सुजात खा रा. गायगाव, नितीन देवराव मोरे रा. डाबकी रोड, इमाम खा सुजात खा रा. गायगाव, गुलाम आबीद गुलाम मुस्तफा रा. गायगाव, अब्दुल आरीफ अब्दुल वहाब, मंगेश भगेवार, मोहसीन खा ऊर्फ मिठ्ठू, आसीफ खा शेख अहमद ऊर्फ फकीरा शेख महेमुद, हरिदास बिल्लेवार, शेख हबीब ऊर्फ कल्या शेख मजीद, चंदन वाकोडे व शेख जहीर शेख अमीर या १३ नराधमांनी अमितला दोराने बांधून ठेवत प्रतीक्षावर सामूहिक बलात्कार करून दोघांचीही हत्या केली होती. त्यानंतर दोघांचेही मृतदेह रेल्वे रुळावर ठेवून ते आत्महत्या करीत असल्याचा बनाव केला होता. यामधील हुसेन खा सुजात खाने आत्महत्या करीत असल्याची खोटी सुसाईड नोटही तयार केली होती. याप्रकरणी उरळ पोलिसांनी १३ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका आरलँड यांच्या न्यायालयात सुरू झाली असून, ५ मार्च रोजी एका साक्षीदाराची तपासणी करण्यात आली तर शुक्रवारी दुसºया मुख्य साक्षीदाराची साक्ष तपासण्यात आली. त्यानंतर आरोपींच्या वकिलांनी मुख्य साक्षीदाराची उलट तपासणी केली. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. सदर साक्षीदाराची साक्ष आणि आरोपींच्या वकीलांची उलट तपासणी तब्बल पाच ते सहा तास चालली. या प्रकरणातील पुढील सुनावणी २२ मे रोजी राहणार असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय