१९३६ जणांनी केली चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST2021-03-27T04:19:42+5:302021-03-27T04:19:42+5:30

शहरात २१८ जण पाॅझिटिव्ह अकाेला : महापालिका क्षेत्रात काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शुक्रवारी विविध भागातील तब्बल २१८ ...

Tested by 1936 people | १९३६ जणांनी केली चाचणी

१९३६ जणांनी केली चाचणी

शहरात २१८ जण पाॅझिटिव्ह

अकाेला : महापालिका क्षेत्रात काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शुक्रवारी विविध भागातील तब्बल २१८ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह प्राप्त झाला. यामध्ये पूर्व झोनअंतर्गत १०४, पश्चिम झोनअंतर्गत ४३, उत्तर झोनअंतर्गत ४० आणि दक्षिण झोनअंतर्गत ३१ अशा एकूण २१८ नागरिकांचा समावेश आहे.

काेराेनामुळे मूर्ख संमेलन रद्द

अकाेला : मागील ४९ वर्षांपासून अकाेलेकरांना खदखदून हसविणारे व हाेळीच्या दुसऱ्या दिवशी आयाेजित केले जाणारे मूर्ख संमेलन यंदा काेराेना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय राजेंद्र श्रीवास, सर्वेशचंद्र कटियार, विकासचंद्र शर्मा, शाहीर वसंत मानवटकर, महादेवराव हुरपडे, रामप्रकाश वर्मा, याेगेश इंगळे, भारत वराेटे, समाधान खरात यांनी घेतला आहे.

पूर्व झाेन काेराेनाचा हाॅटस्पाॅट

अकाेला : शहरात फेब्रुवारी महिन्यापासून काेराेना विषाणूच्या संसर्गात झपाट्याने वाढ झाल्याचे समाेर आले आहे. यातही प्रामुख्याने पूर्व व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. शुक्रवारी शहरातील २१८ जणांना काेराेनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये पूर्व झाेनमधील तब्बल १०४ रुग्णांचा समावेश आहे. नागरिक खबरदारी घेत नसल्यामुळे प्रादुर्भावात वाढ झाली आहे.

मराठा आरक्षण निकाली काढा !

अकाेला : मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. त्यांच्या बेफिकिरीमुळे मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. इंदिरा साहनी खटल्यातील पन्नास टक्के आरक्षण ओलांडण्याच्या सवलतीची तरतूद आघाडी सरकार प्रभावीपणे मांडू शकले नाहीत. राज्य शासनाने मराठा आरक्षणाचा तिढा निकाली काढण्याची मागणी आ. रणधीर सावरकर यांनी केली आहे.

Web Title: Tested by 1936 people