निविदा उघडल्या, अन् कार्यादेशही दिले!

By Admin | Updated: November 22, 2015 02:23 IST2015-11-22T02:23:43+5:302015-11-22T02:23:43+5:30

सिमेंट रस्त्यांच्या सुधारित निविदा; ६ कोटी ३ लाखांची तरतूद.

The tender was opened, and the executive order was given! | निविदा उघडल्या, अन् कार्यादेशही दिले!

निविदा उघडल्या, अन् कार्यादेशही दिले!

अकोला : शहरातील बहुप्रतीक्षित सात सिमेंट रस्त्यांच्या 'वर्किंंग एस्टीमेट'मध्ये बदल करून रस्ता रुंदीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी सिमेंट रस्त्यांच्या उर्वरित कामासाठी सुधारित निविदा प्रकाशित केल्या. शनिवारी मनपाच्या बांधकाम विभागाने प्रमुख चार सिमेंट रस्त्यांच्या निविदा उघडल्या आणि तत्काळ कार्यादेश (वर्कऑर्डर) जारी केले. यासाठी ६ कोटी ३ लाख ७0 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडून १५ कोटींचे अनुदान प्राप्त झाले होते. मनपाने अकरा डांबरी रस्ते, तर सात सिमेंट रस्त्यांचे निर्माण करण्याचा निर्णय घेतला. नऊ डांबरी रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित दोन रस्त्यांचे काम अद्याप बाकी आहे. सात सिमेंट रस्त्यांचे काम दज्रेदार आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी मनपा आयुक्त अजय लहाने आग्रही आहेत. शहराची संभाव्य लोकसंख्या लक्षात घेता सिमेंट रस्ते १८ फूट रुंद नव्हे तर तब्बल ३८ फूटरुंद करून त्यामध्ये दुभाजकाचा समावेश करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेत 'वर्किंंग एस्टीमेट'मध्ये बदल केला. साहजिकच, यापूर्वी मंजूर झालेल्या निधीतून सिमेंट रस्त्यांची कामे करणे शक्य नव्हते. यासाठी आयुक्तांनी सातपैकी चार प्रमुख सिमेंट रस्त्यांच्या उर्वरित कामासाठी सुधारित निविदा प्रकाशित केली. निविदा स्वीकारल्यानंतर शनिवारी उघडण्यात आल्या. विधान परिषद निवडणुकीची संभाव्य आचारसंहिता लक्षात घेता निविदा उघडल्यानंतर त्या मंजूर क रून तडकाफडकी वर्कऑर्डरदेखील देण्यात आली. स्थानिक राजराजेश्‍वर कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे.

Web Title: The tender was opened, and the executive order was given!