आणखी दहा जणांचा मृत्यू, ६५४ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:18 IST2021-05-12T04:18:58+5:302021-05-12T04:18:58+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,८५८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४१३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, ...

आणखी दहा जणांचा मृत्यू, ६५४ नवे पॉझिटिव्ह
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,८५८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४१३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,४५४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी दिवसभरात १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये रेणुकानगर येथील ४१ वर्षीय पुरुष, वाडेगाव ता. बाळापूर येथील ४५ वर्षीय महिला, बोरगाव मंजू येथील ६२ वर्षीय पुरुष, अन्वी मिर्झापूर येथील ८० वर्षीय पुरुष, पीकेव्ही वसाहत येथील ५१ वर्षीय पुरुष, पिंपरी खुर्द येथील ७५ वर्षीय पुरुष, डाबकी रोड येथील ५८ वर्षीय पुरुष, मलकापूर येथील ७२ वर्षीय पुरुष, दगडपारवा ता. बार्शीटाकळी येथील ६५ वर्षीय महिला आणि गांधीग्राम येथील २८ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मूर्तिजापूर-५९, अकोट-नऊ, बाळापूर-५१, तेल्हारा-पाच, बार्शी टाकळी-२९, पातूर-५०, अकोला-२१०. (अकोला ग्रामीण-४०, अकोला मनपा क्षेत्र-१७०)
५५२ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २७, केअर हॉस्पिटल येथील चार, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील दोन, ओझोन हॉस्पिटल येथील दोन, आयकॉन हॉस्पिटल येथील १३, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील आठ, बिहाडे हॉस्पिटल येथील चार, लोहाना हॉस्पिटल येथील एक, कोविड केअर सेंटर अकोट येथील २८, हॉटेल रिजेन्सी येथील तीन, सहारा हॉस्पिटल येथील दोन, इंदिरा हॉस्पिटल येथील एक, फातेमा हॉस्पिटल येथील दोन, अवघते हॉस्पिटल येथील तीन, अथर्व हॉस्पिटल येथील तीन, अकोला ॲक्सिडेंट येथील एक, उशाई हॉस्पिटल येथील एक, तर होम आयसोलेशनमधील ४४५ अशा एकूण ५५२ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.
६,५३९ उपचाराधीन रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४६,९३० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३९,५६४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ८२७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,५३९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.