राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघात अकोल्याचे दहा बॉक्सर

By रवी दामोदर | Updated: March 17, 2024 18:44 IST2024-03-17T18:43:32+5:302024-03-17T18:44:11+5:30

या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर अकोला क्रीडा प्रबोधनीच्या १० खेळाडूंनी महाराष्ट्र बॉक्सिंग संघात स्थान मिळविले.

Ten boxers from Akola in Maharashtra team for national tournament | राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघात अकोल्याचे दहा बॉक्सर

राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघात अकोल्याचे दहा बॉक्सर

अकोला: आगामी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र बॉक्सिंग संघाच्या निवडीसाठी स्थानिक वसंत देसाई स्टेडिअम येथे दि.८ ते १० मार्च दरम्यान महाराष्ट्र राज्य सिलेक्शन ट्रायल स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर अकोला क्रीडा प्रबोधनीच्या १० खेळाडूंनी महाराष्ट्र बॉक्सिंग संघात स्थान मिळविले.

सब ज्युनियर गटात ३५ किलो वजन गटामध्ये संस्कार याने अव्वल येत आपले स्थान पक्के केले. त्याने यापूर्वी शालेय स्पर्धेमध्ये सुर्वण पदकावर नाव कोरले. तसेच वैभव दामोदर, गोपाल रामेश्वर गणोशे, भरत चोपडे, सास्वत महल्ले, याच्यासह गार्गी राऊत, इशिका झामरे, भूतडा, तसेच मुलांच्या गटात अर्थव भट्ट आदींची महाराष्ट्र संघामध्ये निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग स्पर्धेत स्थान मिळविणाऱ्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तथा जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट यांच्याकडे प्रशिक्षणाचे धडे गिरवले आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग संघ हा हरियाणा राज्यातील रोहतक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेणार आहे.

Web Title: Ten boxers from Akola in Maharashtra team for national tournament

टॅग्स :Akolaअकोला