अनुकंपा पद्भरतीसाठी १२६ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी प्रसिध्द !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST2021-09-25T04:19:06+5:302021-09-25T04:19:06+5:30

अकोला: जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा पद्भरतीसाठी १२६ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी शुक्रवार, २४ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द ...

Temporary selection list of 126 candidates for compassionate recruitment published! | अनुकंपा पद्भरतीसाठी १२६ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी प्रसिध्द !

अनुकंपा पद्भरतीसाठी १२६ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी प्रसिध्द !

अकोला: जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा पद्भरतीसाठी १२६ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी शुक्रवार, २४ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून, या निवड यादीवर ८ आॅक्टोबरपर्यंत आक्षेप दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद प्रशासनामार्फत विविध संवर्गातील १७ जागांसाठी अनुकंपा पद्भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी अनुकंपाधारक उमेदवारांच्या प्रतीक्षा यादीमधील १२६ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत २४ सप्टेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आली. प्रसिध्द करण्यात आलेल्या अनुकंपाधारक उमेदवारांच्या तात्पुरत्या निवड यादीवर ८ आॅक्टोबरपर्यंत आक्षेप मागविण्यात आले आहेत. त्यानंतर तात्पुरत्या निवड यादीतील १२६ उमेदवारांपैकी शैक्षणिक पात्रता व ज्येष्ठता यादीनुसार १७ पदांसाठी १७ उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

Web Title: Temporary selection list of 126 candidates for compassionate recruitment published!