तेल्हारा तालुका @९०.४६ %
By Admin | Updated: May 31, 2017 01:14 IST2017-05-31T01:14:30+5:302017-05-31T01:14:30+5:30
तेल्हारा: तालुक्यातून एकूण १,९६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १,७७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, तालुक्यातचा निकाल ९०.४६ टक्के एवढा लागला आहे.

तेल्हारा तालुका @९०.४६ %
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा: तालुक्यातील उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल ३० मे रोजी जाहीर झाला असून, सदर परीक्षेकरिता तालुक्यातून एकूण १,९६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १,७७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, तालुक्यातचा निकाल ९०.४६ टक्के एवढा लागला आहे. तालुक्यातील आठ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला.
तालुक्यातील गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हारा, रंगनाथ महाराज चित्तलवाडी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, नर्मदाबाई बोडखे विज्ञान तेल्हारा या कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तसेच तालुक्यातील नूतन ज्युनियर कॉलेज बेलखेड ९१.५२ टक्के, सेठ बन्सीधर सायन्स ज्युनियर १०० टक्के, डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय कला ७५.२३, वाणिज्य ९६.४९, जिल्हा परिषद महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड रुपराव कला ७५.५८, वाणिज्य ९८.४१, जि.प. ज्युनियर अडगाव बु. ८९.३३, सहदेवराव भोपळे हिवरखेड रुपराव कला ९६.७७, वाणिज्य १०० टक्के, विवेकवर्धिनी भांबेरी ९४.२८, स्व. बाबासाहेब खोटरे सिरसोली ८७.८३, डॉ. जगन्नाथ ढोणे अडगाव बु. विज्ञान ९५, कला ९०, नारायणदेवी शहा ज्युनियर कॉलेज दानापूर ९८.५९, डॉ. जगन्नाथ ढोणे तळेगाव बाजार ९५ टक्के, अजहर उर्दू घोडेगाव खुर्द ९० टक्के, श्रीनाथ उच्च माध्यमिक विद्यालय मनब्दा ९२.५०, स्व. नारायणराव बिहाडे वरुड बिहाडे ९७.४३, युनुसअली ज्युनियर अडगाव बु. ९७.१४, संत गजानन महाराज पाथर्डी सायन्स १०० टक्के, कला ९८.४३, हनिफिया उच्च माध्यमिक उर्दू हिवरखेड रूपराव ८७.७१, श्री अंबिका देवी ज्युनियर सौंदळा ९५.३८, मौलाना अबुल कलाम आजाद हिवरखेड रूप. ९३.९३, कला ४२.८५, कला ८६.५० तर डॉ.गो.जे. होकेशनल तेल्हारा ८४.५२ टक्के एवढा लागला.