सुटीच्या दिवशीही तहसील कार्यालये सुरू; शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 13:10 IST2019-02-18T13:10:36+5:302019-02-18T13:10:41+5:30
अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांच्या याद्या तयार करणे आणि याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यासाठी रविवारी सुटीच्या दिवशीही जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालये सुरू होती.

सुटीच्या दिवशीही तहसील कार्यालये सुरू; शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याची लगबग
अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांच्या याद्या तयार करणे आणि याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यासाठी रविवारी सुटीच्या दिवशीही जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालये सुरू होती. शेतकºयांच्या याद्या तयार करणे आणि ‘अपलोड’ करण्याची लगबग तहसील कार्यालयांमध्ये सुरू होती.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकºयांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांच्या याद्या तयार करणे आणि तयार झालेल्या शेतकºयांच्या गावनिहाय याद्या केंद्र शासनाच्या ‘पीएम-किसान’ पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार रविवारी सुटीच्या दिवशी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालये दिवसभर सुरू होती. तहसील कार्यालयातील संबंधित महसूल अधिकारी-कर्मचाºयांसह तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांमार्फत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या याद्या तयार करणे आणि तयार करण्यात आलेल्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे काम तहसील कार्यालयांमध्ये सुरू होते.