शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

शाळा-महाविद्यालय परिसरात चिडीमारांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 4:03 PM

अकोला - शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात चिडीमारांचा प्रचंड हैदोस सुरू असून, याकडे दामिनी पथक व संबंधित पोलीस ठाण्याचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

अकोला - शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात चिडीमारांचा प्रचंड हैदोस सुरू असून, याकडे दामिनी पथक व संबंधित पोलीस ठाण्याचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. टवाळखोरांनी शाळेतील विद्यार्थिनींना शाळेत जाऊन मारहाण केल्याची घटना भारत विद्यालयात घडल्याने पोलिसांचा धाक उरला नसल्याचे वास्तव आहे.शहरातील शाळा व महाविद्यालयांसमोर टवाळखोर युवकांच्या टोळ्याच दिवसभर ठाण मांडून असतात. व्हाईटनर तसेच विविध द्रव्यांची नशा करून येणाऱ्या-जाणाºया मुलींची छेडखानी करणे, त्यांना उद्देशून बोलणे अशा प्रकारच्या छेडखानीसह विद्यार्थिनींचा पाठलाग करण्याचे प्रकार शहरात सर्रास सुरू आहेत; मात्र दामिनी पथक केवळ शहराबाहेरच्या ठिकाणांवर फेºया मारीत असून, या पथकाने शाळा व महाविद्यालयासमोरील टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी विद्यार्थिनींकडून करण्यात येत आहे. या गुंड प्रवृत्तीच्या युवकांची व टवाळखोरांची दादागिरी वाढत असून, पोलिसांनाही खिशात घेऊन असल्याची बतावणी थेट विद्यार्थिनींना करतात, त्यामुळे या टवाळखोरांचा हैदोस प्रचंड वाढला असताना त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत नसल्याचे वास्तव आहे. पोलीस अधीक्षक व ठाणेदारांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन दुचाकींवर फटाके फोडणारे, वेगात दुचाकी चालविणाºया या टवाळखोर युवकांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. महाविद्यालयांमध्ये युवकांच्या टोळ्यांमुळे विद्यार्थी असुरक्षितशहरातील बहुतांश महाविद्यालयातील विद्यार्थिनी असुरक्षित आहेत. यामध्ये शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राचार्यांच्या पुढे-पुढे करणाºया काही विद्यार्थ्यांनी महधत्त्वाची पदे ताब्यात घेऊन येथील विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करण्याचे प्रताप केले आहेत. यामधील दोन विद्यार्थिनी पोलीस तक्रारीसाठी पुढे आल्या; मात्र ठाण्यात येण्यापूर्वीच आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीपोटी तक्रार देण्याचे टाळल्याने या टोळीतील युवकांचे चांगलेच फावले आहे. स्वत:ला वक्ते व प्रवक्ते म्हणून घेणाºया विद्यार्थ्यांनी येथील विद्यार्थिनींचा चांगलाच छळ सुरू केला आहे; मात्र प्राचार्यांच्या खास मर्जीतील हे विद्यार्थी असल्याने विद्यार्थिनीही तक्रार करण्याची भीती बाळगत असल्याची माहिती येथील विद्यार्थिनींनीच दिली.

 

टॅग्स :Akolaअकोलाcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी