शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता यादीवरून ‘अर्थ’कारण

By admin | Updated: June 20, 2015 02:43 IST

मनपाच्या शिक्षण विभागाचा कारभार ढेपाळला.

अकोला : शिक्षण विभागाने मनमानीरीत्या शाळा समायोजनाचा निर्णय घेतल्यानंतर आता शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता यादीला मंजुरी देण्याचे प्रयत्न चालविले आहेत. याकरिता काही शिक्षक संघटनांसोबत अर्थपूर्ण बोलणी सुरू असल्याची माहिती उजेडात आली आहे. महापालिकेच्या शाळेत गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात. मनपाच्या पंधरा वर्षांंच्या क ालावधीत विद्यार्थी संख्या टिकवण्याचे शिक्षण विभागाने कवडीचेही प्रयत्न न केल्यामुळे पटसंख्येचा आलेख दिवसेंदिवस घसरला. सन २00६-0७ मध्ये मनपाच्या ७४ पैकी १९ शाळांचे समायोजन केल्यानंतरही शिक्षण विभागाला जाग आली नाही. खासगी कॉन्व्हेंटच्या तुलनेत मनपा शाळेतील शिक्षणाचा दर्जा, मूलभूत सुविधा सुमार असल्याचा आरोप करीत पालकांनी मनपा शाळांकडे पाठ फिरवली. शिक्षण विभागाचे कामकाज प्रामाणिकपणे चालविण्याचा डंका वाजविणार्‍या शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांच्या कार्यकाळात पुन्हा एकदा ५५ शाळेपैकी २१ शाळांचे समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पटसंख्या कमी झाल्याची सबब पुढे करीत आयुक्त सोमनाथ शेटे यांनी नियमबाह्यरीत्या शाळा समायोजनाचा निर्णय घेतला. अर्थातच, आगामी काही दिवसांत अतिरिक्त शिक्षकांची ह्यशाळाह्ण भरवून खिसे जड करण्याचे उद्योग जोराने सुरू होणार आहेत. यादरम्यान, शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता यादीला मंजुरी देण्यापूर्वीच अर्थकारणाला वेग आला आहे. शाळांचे समायोजन केले, त्याचवेळी उच्च शिक्षित मुख्याध्यापक-शिक्षकांच्या नेमणुकीची व सेवा ज्येष्ठतेची प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. शालेय सत्र सुरू होण्याला अवघा आठवडाभराचा कालावधी असताना शिक्षण विभागाने सेवा ज्येष्ठतेचे घोडे दामटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांच्या कार्यशैलीवर उर्दू शिक्षक संघटनेसह इतर संघटनांची तीव्र नाराजी आहे. काही शिक्षकांनी या मुद्यावर शिक्षणाधिकार्‍यांना घेरण्याची तयारी चालविली आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.