teachers to give Two days pay to help farmers | शेतकऱ्यांना मदत म्हणून शिक्षक देणार दोन दिवसांचे वेतन!
शेतकऱ्यांना मदत म्हणून शिक्षक देणार दोन दिवसांचे वेतन!

अकोला: परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून नेला. मूग, उडीद गेले. सोयाबीन पाण्यात भिजले. कपाशीची बोंडे सडली. शेतकरी देशोधडीला लागला. शेती आणि शेतकºयांचे विदारक चित्र पाहून, शिक्षकांचे मनसुद्धा खिन्न झाले आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघ पुढे सरसावला आहे. शेतकºयांसाठी शिक्षक दोन दिवसांचे वेतन देणार आहेत.
सध्या परतीच्या पावसाने शेतकºयांच्या तोंडच्या पाणी पळविले आहे. जिल्ह्यात सर्वत्रच शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकºयांचे बळ खचले आहे. शेतकरी संकटात सापडला असताना, प्रशासन मात्र गंभीर नाही. रब्बी हंगाम तोंडावर असताना शेतकºयांच्या बियाणे, खते खरेदी करण्यासाठी पैसा नाही. अशा परिस्थितीत पदर कोणाकडे पसरावा, अशी परिस्थिती आहे. ही स्थिती, विदारक चित्र पाहून, शिक्षकांचे मनही हेलावून गेले आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी आणि शिक्षक पुढे सरसावले आहेत. शिक्षक संघटनेतील सर्व पदाधिकारी आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणाºया शिक्षकांनी दोन दिवसांचे वेतन शेतकºयांना देण्याचा निर्णय घेतला आहे. खारीचा वाटा असलेल्या या मदतीमुळे शेतकºयांची परिस्थिती सुधारणार तर नाही; परंतु त्यांना बळ मिळेल. या उद्देशाने राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघ निधी संकलित करणार आहे. सोमवारपासून या कामाला सुरुवात केली आहे. अधिकाधिक निधी संकलित करून हा निधी थेट मुख्यमंत्री सहायता निधीत जमा न करता, थेट शेतीच्या बांधावर जाऊन शेतकºयांना देण्यात येणार आहे.


मी एका शेतकºयाचा मुलगा आहे. शेती आणि शेतकºयांची विदारक परिस्थिती आहे. पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकºयांना संकटात सावरण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठीच शिक्षकांनी दोन दिवसांचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकांनी शेतकºयांना आर्थिक मदत करावी.
- मनीष गावंडे, राज्याध्यक्ष, राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघ

 

Web Title: teachers to give Two days pay to help farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.