शिक्षकांचा मोबाईल वापर सुरूच
By Admin | Updated: August 18, 2014 22:40 IST2014-08-18T22:16:27+5:302014-08-18T22:40:57+5:30
शिक्षकांचे अपडाउन व मोबाईलचा वापर सुरू असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

शिक्षकांचा मोबाईल वापर सुरूच
दगडपारवा - येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांचे अपडाउन व मोबाईलचा वापर सुरू असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. शिक्षकांनी शिकवणीच्यावेळी मोबाईलचा वापर करू नये असा नियम आहे. परंतु येथील शिक्षकांनी हा नियम बासनात गुंडाळला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक कोणीच मुख्यालयी हजर राहत नसल्याने मनमानी सुरू आहे. येथील शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था नाही. खिचडी खाल्लयानंतर विद्यार्थी पाण्यासाठी भटकतात.
जिल्हा परिषदेनी दगडपारवा शाळेला पाण्याची टाकी, सिमेंटचे टाके अशी सुवीधा उपलब्ध करू न दिली होती. मात्र शाळा समिती व मुख्याध्यापकामुळे विद्यार्थ्यांची तहान अजुनही भागलेली नाही. पाणी नसल्यामुळे विद्यार्थी घरी येवून खिचडी भोजन करतात.
येथे बांधलेल्या नवीन खोलीला गळती लागल्यामुळे कामाबाबत शका उपस्थित होत.
शाळा वेळेवर उघडत नाही. दिड महिन्यापासून विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही. या समस्येकडे अधिकार्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.