तीन पट कर आकारणी; आज निर्णय

By Admin | Updated: September 2, 2015 02:31 IST2015-09-02T02:31:55+5:302015-09-02T02:31:55+5:30

अकोलेकरांना मूलभूत सुविधा न देता प्रशासनाने भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीच्या माध्यमातून तीन पट कर आकारणीचा प्रस्ताव तयार केला.

Taxation by three times; Decision today | तीन पट कर आकारणी; आज निर्णय

तीन पट कर आकारणी; आज निर्णय

अकोला: अकोलेकरांना मूलभूत सुविधा न देता, महापालिकेच्या तिजोरीला ओरबडणार्‍या प्रशासनाने भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीच्या माध्यमातून तीन पट कर आकारणीचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावावर उद्या २ सप्टेंबर रोजी विशेष सभेत निर्णय होण्याची शक्यता आहे. नियमित कर आकारणी केल्यास मनपाला किमान ३५ ते ४0 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होऊ शकते. यादरम्यान, तत्कालीन आयुक्त सोमनाथ शेटे यांनी भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीचा प्रस्ताव शासनापुढे दामटला. तर काही अधिकार्‍यांनी मनपाला १२0 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होणार असल्याचे आश्‍वासन दिले. भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी केल्यास अकोलेकरांवर तीन पट कर लादल्या जाणार असल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी सत्ताधार्‍यांनी २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन केले आहे. तत्पूर्वी, ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल यांनी प्रशासनाच्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रेडीरेकनरचे दर लावण्याकरिता शहराची झोननिहाय वर्गवारी क रणे प्रशासनाकडून अपेक्षित असून, सत्ताधार्‍यांना डावलून असा कोणताही प्रस्ताव लागू होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Taxation by three times; Decision today