शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

करवाढ; अकोलेकरांना करावे लागणार ‘सेल्फ असेसमेंट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 1:11 PM

मनपा प्रशासनाने ‘सेल्फ असेसमेंट’ (मालमत्ताधारकाने स्वत: केलेले पुनर्मूल्यांकन) करण्याचा निर्णय घेतला असून, अकोलेकरांना तशा स्वरूपाच्या नोटीस जारी करण्याचे काम सुरू झाले आहे.

- आशिष गावंडे  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका प्रशासनाने सुधारित करवाढकरून अकोलेकरांकडून वसूल केलेल्या मालमत्ता कराची संपूर्ण प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा आदेश नागपूर उच्च न्यायालयाने देत याप्रकरणी कर आकारणीचा निकष स्पष्ट करीत नव्याने कर आकारणीचे निर्देश दिले होते. त्या पृष्ठभूमीवर मनपा प्रशासनाने ‘सेल्फ असेसमेंट’ (मालमत्ताधारकाने स्वत: केलेले पुनर्मूल्यांकन) करण्याचा निर्णय घेतला असून, अकोलेकरांना तशा स्वरूपाच्या नोटीस जारी करण्याचे काम सुरू झाले आहे.महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्तांचे १९९८ पासून ते २०१६ पर्यंत पुनर्मूल्यांकन रखडले होते. यामुळे मनपाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. उशिरा का होईना, २०१६ मध्ये प्रशासनाने मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. ‘जीआयएस’प्रणालीद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण, मोजमाप करून प्रशासनाने सुधारित करवाढ लागू केली. २०१६ पूर्वी मनपाच्या दप्तरी ७१ हजार मालमत्ता होत्या. मूल्यांकनानंतर त्यामध्ये वाढ होऊन १ लाख ४ हजार व हद्दवाढ झालेल्या क्षेत्रात ५० हजार अशा एकूण १ लाख ५४ हजार मालमत्तांची नोंद करण्यात आली. यापासून मनपाला दरवर्षी ७० कोटींचे उत्पन्न प्राप्त होणार होते. चालू व थकीत मालमत्ता कराच्या एकूण १३५ कोटींपैकी आजवर मालमत्ता कर वसुली विभागाने केवळ ३७ कोटींची वसुली केली.यादरम्यान, प्रशासनाने लागू केलेली मालमत्ता कराची संपूर्ण प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा आदेश नागपूर उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने आॅक्टोबर २०१९ मध्ये दिला होता. याप्रकरणी कर आकारणीचा निकष स्पष्ट करीत नव्याने कर आकारणीचे निर्देश न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाने भाडेमूल्यावर आधारित कर मूल्यांकन करण्याचा निर्णय घेऊन नागरिकांनी स्वत:हूनच त्यांच्या इमारतींचे व प्राप्त होणाऱ्या भाड्याच्या रकमेचे ‘सेल्फ असेसमेंट’ करण्याच्या अनुषंगाने नोटीस जारी केल्या आहेत.

करवाढीचे संकेत; कोर्टात अर्जसुधारित कर लागू करताना निकष स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. निकषानुसार कर प्रणाली लागू केल्यास कराच्या रकमेत दुपटीने वाढ होणार असल्याचे बोलल्या जाते. ही बाब ध्यानात येताच मनपा प्रशासनाने नागपूर हायकोर्टात पुनर्विलोकन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर न्यायालय काय निर्देश देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विवरण पत्रात अचूक माहिती देणे बंधनकारकउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांना मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्या जात असल्याची नोटीस दिली जात आहे. त्यासोबतच मालमत्ताधारकाचे नाव, प्रभाग क्रमांक, मालमत्ता-प्लॉट तसेच सर्व्हे क्रमांकाचा उल्लेख असल्याचे सविस्तर विवरणपत्र दिले जात असून, स्वत:चे घर, दुकान, भाड्याने दिलेल्या खोल्या-दुकान यांचा क्षेत्रफळासह व आकारणी केलेल्या मासिक भाड्याची अचूक माहिती देणे बंधनकारक आहे. ही माहिती पडताळणीत चूक ठरल्यास मनपाची कर आकारणी लागू केली जाणार आहे.

सुधारित कर प्रणाली लागू करण्याच्या अनुषंगाने आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत मालमत्ताधारकांना नोटीस व विवरणपत्र जारी केले आहे. उच्च न्यायालयात सादर केलेल्या पुनर्विलोकन अर्जावर उद्या शुक्रवारी न्यायालयाकडून निर्देश प्राप्त होण्याची शक्यता आहे.-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाTaxकर