राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधनीच्या तन्मयला कास्यं; सिक्कीम येथे पार पडली स्पर्धा  

By रवी दामोदर | Updated: July 7, 2023 18:29 IST2023-07-07T18:28:53+5:302023-07-07T18:29:17+5:30

६ वी युथ राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा  सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे पार पडली.

Tanmayala Kasya of Akola Krida Prabodhini in National Boxing Competition competition was held in Sikkim | राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधनीच्या तन्मयला कास्यं; सिक्कीम येथे पार पडली स्पर्धा  

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधनीच्या तन्मयला कास्यं; सिक्कीम येथे पार पडली स्पर्धा  

अकोला : ६ वी युथ राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा  सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे पार पडली. या स्पर्धेत देशभरातून बॉक्सरपटूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधनीचा बॉक्सर तन्मय कलंत्रे याने उत्कृष्ट प्रदर्शन करून कास्यं पदक प्राप्त करीत देशातून तिसरा क्रमांक पटकाविला. 

 अकोला क्रीडा प्रबोधनीच्या बॉक्सरांनी राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुयश मिळवित जिल्ह्याचे नाव चमकाविले आहे. त्यात तन्मय कलंत्रे हा देशातून तिसऱ्या क्रमांकाचा बॉक्सर ठरल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ६ वी युथ राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत तन्मय कलंत्रे याने ४८ किलो वजन गटात हरियाणाच्या बॉक्सरला पटकनी देत कास्यं पदक मिळविले आहे. यापूर्वी त्याने अंतरराष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिरासाठी आपले स्थान निश्चित केले आहे. तसेच त्याने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे.  

 युथ राष्टीय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघासोबत प्रशिक्षक म्हणून अदित्य मने, गजानन कबीर यांनी काम पाहिले. तन्मय कलंत्रे यांने बॉक्सिंगचे धडे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक तथा जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांच्याकडे घेतले आहे.
 

Web Title: Tanmayala Kasya of Akola Krida Prabodhini in National Boxing Competition competition was held in Sikkim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.