शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

वीज मीटरमध्ये फेरफार करणे ३०३ ग्राहकांना पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 11:57 IST

Tampering in electricity meters : मागील ५ महिन्यात अकोला जिल्ह्यातील ३०३ वीज ग्राहकांवर कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्दे८७.७ लाख रुपयांचा दंड वसूल ५ लाख ९१ हजार युनिटची वीज चोरी उघड

अकोला : वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास महावितरणकडून वीज ग्राहकांवर कलम १३५ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. मागील ५ महिन्यात अकोला जिल्ह्यातील ३०३ वीज ग्राहकांवर कारवाई करण्यात आली असून, या ग्राहकांकडून ८७. ७ लाख रुपये एवढा दंडही वसूल करण्यात आलेला आहे.आगामी काळात महावितरणकडून वीज चोरांच्या विरोधात ही मोहीम अधिक गतिशील करण्यात येणार आहे.

एप्रिल ते ऑगस्ट - २०२१ या कालावधीत महावितरणकडून जिल्ह्यातील अडीच हजार वीज ग्राहकांचे वीज मीटर तपासण्यात आले. यातील ३०३ वीज ग्राहकांनी वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याचे निदर्शनास आढळून आले. या वीज ग्राहकांनी महावितरणच्या ५ लाख ९१ हजार ७०४ युनिटची वीज चोरी केल्याचे तपासणीत आढळून आले. सोबतच ७ वीज ग्राहकांनी मंजूर जोडभारापेक्षा अधिक जोडभार वापरल्याच्या घटना आढळून आल्या. या वीज ग्राहकांना देखील दणका देत दीड लाख रुपयाची वसुली करण्यात आली आहे.

 

काय म्हणतो कायदा

वीज मीटरमध्ये फेरफार अथवा छेडखानी करणे हा विद्युत कायद्यानुसार गुन्हा असून या अंतर्गत संबंधित वीज ग्राहकावर कलम १३५ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो.तसेच अशा ग्राहकावर मीटर रीडिंगच्या दुप्पट रक्कम आकारण्यात येते. प्रति केडब्ल्यूएचपी नुसार औद्योगिक ग्राहकावर १० हजार रुपये,वाणिज्यिक ग्राहकावर ५ हजार रुपये,कृषी ग्राहकावर १ हजार रुपये तर इतर वर्गवारीतील ग्राहकावर २ हजार रुपये दंडात्मक कारवाई म्हणून आकारण्यात येते. गुन्हा सिद्ध झाल्यास ३ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.वीज मीटरमध्ये फेरफार करण्यासाठी प्रवृत्त व सहकार्य करणाऱ्या विरुद्ध विद्युत कायद्यातील कलम १५० नुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.

 

अशी केली जाते चलाखी

वीज मीटरमध्ये फेरफार करून किंवा छेडखानी करून ग्राहक वीज बिल कमी करण्याचा प्रयत्न करतात.त्यासाठी मॅग्नेट किंवा चीप लावून मीटरची गती कमी करण्याचा प्रयत्न करतात. रिमोटच्या माध्यमातूनही असे प्रकार करण्यात आल्याचे यापूर्वी उघड झाले आहे.

वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांवर महावितरणची कडक नजर असून मीटरमध्ये फेरफार केल्यास मीटर जप्त करण्यात येतो. जबर दंडात्मक कारवाईही केली जाते आणि फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येतो.त्यामुळे ग्राहकांनी असे कोणतेही बेकायदेशीर कृत्य न करता वीज बिलांचा नियमित भरणा करून महावितरणला सहकार्य करावे.

पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता, महावितरण, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण