राजनखेड येथे तालुकास्तरीय पुण्यतिथी महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:19 IST2020-12-06T04:19:21+5:302020-12-06T04:19:21+5:30

त्या निमित्त शनिवारी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटाला भव्य मौन श्रद्धांजली व सामुदायिक प्रार्थना घेण्यात येणार आहे. हभप ...

Taluka level Punyatithi Festival at Rajankhed | राजनखेड येथे तालुकास्तरीय पुण्यतिथी महोत्सव

राजनखेड येथे तालुकास्तरीय पुण्यतिथी महोत्सव

त्या निमित्त शनिवारी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटाला भव्य मौन श्रद्धांजली व सामुदायिक प्रार्थना घेण्यात येणार आहे. हभप श्रीकृष्ण पांडे, राजंदा यांचया प्रार्थनेवर चिंतन होणार आहे. त्यानंतर रात्री ८ वा. खंजिरी भजन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला जिल्हा प्रचार प्रमुख डॉ. अशोक रत्नपारखी, तालुका प्रचार प्रमुख देवीदास कावरे, तालुका सेवाधिकारी संतोष सोनोने, कृषिभूषण मधुकरराव सरप, मध्यवर्ती प्रतिनिधी गावंडे, श्रीकृष्ण ठोंबरे, सरचिटणीस रविसिंग डाबेराव, केंद्र प्रमुख सुरेश सावरकर,धनंजय ढोरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री रावसाहेब घुगे, संदीप घुगे, उत्तम घुगे, ज्ञानदेव बांगर, गजानन सानप, शेषराव घुगे, बाबाराव पाटील, श्रीराम पवार, अंगत घुगे, संजय घुगे, देवानंद घुगे, प्रमोद मयधने परिश्रम घेत आहेत. तालुक्यातील सर्व गुरुदेव सेवकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन गुरुदेव सेवा मंडळ राजनखेड यांनी केले आहे. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख प्रदीप गावंडे यांनी दिली.

Web Title: Taluka level Punyatithi Festival at Rajankhed