रेल्वे वॅगनवर चढून सेल्फी काढणे भोवले; अल्पवयीन मुलगा जखमी, अकोला रेल्वे स्थानकावरील घटना
By रवी दामोदर | Updated: June 30, 2023 17:12 IST2023-06-30T17:12:03+5:302023-06-30T17:12:08+5:30
अकोला रेल्वे स्थानकातील मालधक्का परिसरात रेल्वेच्या वॅगनवर सेल्फी घेणे एका अल्पवयीन युवकास महागात पडले.

रेल्वे वॅगनवर चढून सेल्फी काढणे भोवले; अल्पवयीन मुलगा जखमी, अकोला रेल्वे स्थानकावरील घटना
अकोला: स्थानिक रेल्वे स्थानकातील मालधक्का परिसरात रेल्वेच्या वॅगनवर सेल्फी घेणे एका अल्पवयीन युवकास महागात पडले असून, सेल्फीच्या नादात ओव्हरहेड विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने तो मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.
शहरातील लक्कडगंज येथे राहणारा १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा अकोला रेल्वे स्टेशन येथील मालधक्का परिसरात आला. येथे उभ्या असलेल्या वॅगनवर चढून सेल्फी घेत असतानाच त्याला ओव्हरहेड विद्युत वाहिनीचा शॉक लागला. त्यात तो गंभीर जखमी झाला. यात त्याच्या पायाला व इतर ठिकाणी भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत. सध्या त्या जखमी युवकावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती होताच लोहमार्ग पोलिसांनी त्याला तत्काळ सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेले. त्या जखमी मुलाची तब्बेत स्थिर असल्याची माहिती आहे.