गोर सेनेने केले लाक्षणिक उपोषण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:24 IST2021-09-08T04:24:44+5:302021-09-08T04:24:44+5:30

अकोला: मुंबई विमानतळाला हरितक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी गोर सेना अकोला ...

Symbolic fast by Gore Sena! | गोर सेनेने केले लाक्षणिक उपोषण!

गोर सेनेने केले लाक्षणिक उपोषण!

अकोला: मुंबई विमानतळाला हरितक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी गोर सेना अकोला जिल्हा शाखेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले व मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी गोर सेना अकोला जिल्हा शाखेच्यावतीने मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या लाक्षणिक उपोषणात गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष गोरसिंग राठोड, मनोहर जाधव, रामेश्वर राठोड, अर्जुन जाधव, तुळशीराम चव्हाण, बाबुलाल राठोड, सुरेश राठोड, अरविंद राठोड, अक्षय राठोड, शैलेश राठोड, अभय राठोड, सचिन चव्हाण, सूरज राठोड, दीपक जाधव, मुकेश जाधव आदी सहभागी झाले होते. दरम्यान मागणी मान्य झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला.

..................फोटो.........................

Web Title: Symbolic fast by Gore Sena!