किरकोळ वादातून तलवारी उपसल्या

By Admin | Updated: September 19, 2016 02:48 IST2016-09-19T02:48:24+5:302016-09-19T02:48:24+5:30

चार जण जखमी, दोन्ही गटातील आरोपीविरुद्ध गुन्हा.

Swords are available through minor disputes | किरकोळ वादातून तलवारी उपसल्या

किरकोळ वादातून तलवारी उपसल्या

अकोला, दि. १८: किरकोळ वादातून एकाच समाजातील दोन गटात वाद झाला आणि तलवारी उससण्यापर्यंत मजल गेली. यात चार जण किरकोळ जखमी झाले. ही घटना दुपारी १.३0 वाजताच्या सुमारास जुने शहरातील काळा मारोती मंदिर परिसरात घडली. जुने शहर पोलिसांनी दोन्ही गटातील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अजीम शाह अयूब शाह (२७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी दुपारी ते घराबाहेर उभे असताना, आरोपी रेहान शाह रऊफ शाह, समीर शाह इब्राहिम शाह हे त्यांच्याकडे रागाने पाहात होते. त्यांना का रागाने पाहात आहात, असे विचारल्यावर आरोपींनी वाद घातला आणि घरातून तलवारी आणून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात चार जण जखमी झाले. त्यांना सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले.
रेहान शाह याने दिलेल्या तक्रारीमध्ये अजीम शाह व त्यांच्या घरातील सदस्यांनी विनाकारण वाद घातला. अश्लील शिवीगाळ केली आणि तलवारीने हल्ला चढविला. यात आम्हाला दुखापत झाली, असा आरोप केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावर दाखल दोन्ही गटातील आरोपींना ताब्यात घेतले. परस्परांविरुद्ध दिलेल्या तक्रारीनुसार, जुने शहर पोलिसांनी भादंवि कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Swords are available through minor disputes