तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:16 IST2021-01-04T04:16:32+5:302021-01-04T04:16:32+5:30
खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्याअंतर्गत मळसूर परिसरात तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या व्यक्तीला रविवारी (दि. ३) दुपारी तलवारीसह ...

तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्याला अटक
खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्याअंतर्गत मळसूर परिसरात तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या व्यक्तीला रविवारी (दि. ३) दुपारी तलवारीसह विशेष पथकाने ताब्यात घेतले. चान्नी पोलीस ठाण्याअंतर्गत गावंडगाव येथील धरणाजवळ मळसूर परिसरात एक व्यक्ती अवैधरीत्या तलवार हातात घेऊन दहशत पसरवीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे विशेष पथकाने मळसूर परिसरात सापळा रचून छापा टाकला असता एक व्यक्ती हातात तलवार घेऊन अवैधरीत्या दहशत निर्माण करताना आढळून आली. त्याला तलवारीसह ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याने तलवार कशासाठी आणली होती. त्यामागे उद्देश काय होता, या प्रकरणाचा तपास झाल्यानंतरच स्पष्ट होईल. याप्रकरणी चान्नी पोलीस ठाण्यामध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात येईल, अशी माहिती विशेष पथकातील सूत्रांनी दिली.