बार्शीटाकळी तालुक्यात बिबटाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 02:52 PM2018-05-23T14:52:09+5:302018-05-23T14:52:09+5:30

सायखेड : (जि. अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील चेलका (निंबी) शिवारात तलावाचे परिसरात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवार, २३ मे रोजीसकाळी उघडकीस आली.

Suspicious death of leopard in Barshitakali taluka | बार्शीटाकळी तालुक्यात बिबटाचा संशयास्पद मृत्यू

बार्शीटाकळी तालुक्यात बिबटाचा संशयास्पद मृत्यू

Next
ठळक मुद्देबिबट्याच्या मृतदेहावरील जखमेच्या खुणांवरून विविध तर्क-वितर्क वर्तविले जात आहेत बिबट्याला कुणीतरी शिकारीच्या उद्देशाने मारले असावे, असा घातपाताचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. तर दुसरीकडे पाणी पिण्यासाठी तलावावर आलेल्या हिंस्र प्राण्यांच्या झुंजीत बिबटाचा मृत्यु झाला असावा, असा अंदाज वनविभागाकडून केल्या जात आहे.


सायखेड : (जि. अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील चेलका (निंबी) शिवारात तलावाचे परिसरात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवार, २३ मे रोजीसकाळी उघडकीस आली.
बिबट्याच्या मृतदेहावरील जखमेच्या खुणांवरून विविध तर्क-वितर्क वर्तविले जात आहेत. बिबट्याला कुणीतरी शिकारीच्या उद्देशाने मारले असावे, असा घातपाताचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. तर दुसरीकडे पाणी पिण्यासाठी तलावावर आलेल्या हिंस्र प्राण्यांच्या झुंजीत बिबटाचा मृत्यु झाला असावा, असा अंदाज वनविभागाकडून केल्या जात आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्ािंनी घटनास्थळी जाऊन मृत बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. नेमका हा मृत्यु कशामुळे झाला, हे शवविच्छेदनानंतर समजणार आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ परिसरात जाऊ पाऊलखुणांची व इतर बाबीची बारकाईने माहिती घेतली.

पेट्रोलिंग फक्त नावापुरतीच
अधिकारी कार्यालय धाबा येथील वनकर्मचारी रात्रीची गस्त फक्त नावापुरतीच असल्याचे या घटनेवरून दिसून येते. वनसंरक्षणामध्ये कामचुकारपणा होत असून याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.


बिबटाचा मृत्यू दोन दिवसापूर्वीच!
चेलका (निंबी) शिवारात मृत्यु झालेल्या बिबट्याच्या मृत शरीरची दुर्गंधी सुटल्यामुळे हा मृत्यु दोन दिवसापूर्वीच झाला असल्याचा अंदाज आहे. मनानेभोवती मोठ्या जखमेचा घाव असून या जखमेवरूनच संशय निर्माण झाला आहे. याचे खरे कारण शवविच्छेदन झाल्यानंतरच समजेल.

Web Title: Suspicious death of leopard in Barshitakali taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.