शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या २६ शिक्षकांवर निलंबनाची टांगती तलवार

By admin | Updated: June 10, 2015 02:15 IST

शिक्षकांना जुंपले; विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासह मालमत्ता मोजणीचा आग्रह.

आशीष गावंडे /अकोला : महापालिका शाळांचे नियमबाह्य समायोजन केल्यानंतर विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने किमान दहा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देण्याचे फर्मान आयुक्त सोमनाथ शेटे यांनी जारी केले होते. एकीकडे विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचे निर्देश देणार्‍या प्रशासनाने तब्बल ७0 शिक्षकांना मालमत्ता पुनर्मूल्यांकन मोहिमेला जुंपत, मोहिमेला अनुपस्थित राहणार्‍या चक्क २६ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित आहे. महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रशासनाने मालमत्ता पुनर्मूल्यांकन मोहीम सुरू केली. पहिल्या टप्प्यात दक्षिण झोनमधील मालमत्तांचे मोजमाप आटोपल्यानंतर प्रशासनाने १ जूनपासून पूर्व झोनमध्ये मालमत्ता मोजणीला सुरुवात केली. मोहिमेसाठी जलप्रदाय विभाग, बांधकाम विभाग, नगर रचना विभागातील अभियंत्यांचा समावेश केल्यानंतर सुमारे ७0 शिक्षकांनादेखील समाविष्ट करण्यात आले. मनपा शाळांच्या समायोजनाचे कोणतेही निर्देश नसताना आयुक्त सोमनाथ शेटे यांनी मनमानीरीत्या ५५ शाळांतून २२ शाळांचे समायोजन के ल. तसेच केजी-१, केजी-२ च्या प्रस्तावासह सेमी इंग्लिशचा प्रस्ताव लागू करण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने किमान १0 विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देण्याचे उद्दिष्ट आयुक्तांनी दिले. तसे न झाल्यास जून, जुलै महिन्याचे वेतन कपात करण्याचा इशारा दिला. अशा स्थितीत मालमत्ता मोजणीसाठी शिक्षकांचा समावेश करणे कितपत योग्य होते, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, प्रभारी उपायुक्त माधुरी मडावी यांनी मोजणीदरम्यान सतत गैहजर राहणार्‍या २६ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित केली. *निलंबनाचा केवळ धाक ?पुनर्मूल्यांकन मोहिमेला गैरहजर राहणार्‍या शिक्षकांना केवळ धाक दाखवण्यासाठी निलंबनाची कारवाई प्रस्तावित केल्याची लंगडी सबब समोर आली. मुळात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांमधील मानापमान नाट्याला ह्यलोकमतह्णने चव्हाट्यावर आणल्यानंतर प्रशासन निलंबनाचा निर्णय मागे घेणार असल्याची माहिती आहे.*म्हणे, स्वखुशीने झाले दाखल!पटसंख्या कमी झाल्याची सबब पुढे करीत प्रशासनाने शाळांचे समायोजन केले. उर्वरित शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रत्येक शिक्षकाला दहा विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचे 'टार्गेट' देण्यात आले असताना मालमत्ता मोजणीचे अतांत्रिक काम शिक्षकांनी स्वीकारले कसे, यावर प्रशासनाचे उत्तर मजेशीर आहे. मोहिमेत संबंधित शिक्षक स्वखुशीने दाखल झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे.