Suspected death of a person's in forest | बुलडाणा जिल्ह्यातील व्यक्तीचा वसाली जंगलात संशयास्पद मृत्यू
बुलडाणा जिल्ह्यातील व्यक्तीचा वसाली जंगलात संशयास्पद मृत्यू

खेट्री : नजीकच्या वसाली गावा पासून ५०० मीटरच्या अंतरावर एका ४५ वर्षाच्या इसमाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवार रोजी च्या सकाळी उघडकीस आली, घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे, किरण गवई, संतोष जाधव, बालाजी सानप, आदींनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले, सदर मृतक साखरखर्डा येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले, सदर इसमाचा मृत्यू चार ते पाच दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला, प्रल्हाद अप्पा परशराम आप्पा डाकोरे,४५ रा. साखरखेर्डा तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा असे मृतकाचे नाव आहे. पंचनामा करताना अनेक तास त्याची ओळख पटली नव्हती, परंतु त्याच्या परंतु त्याच्या खिशामध्ये साखरखेर्डा एसटी बस डेपो चे तिकीट मिळाले त्यात तिकिटावर त्यांनी पोलिसांनी मृतकाचा शोध लावला, पुढील तपास ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनात किरण गवई करीत आहेत.


Web Title: Suspected death of a person's in forest
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.