सुपर पॉवर घोटाळा, गुंतवणूकदारांना फुटला घाम !
By Admin | Updated: November 22, 2014 01:36 IST2014-11-22T01:36:40+5:302014-11-22T01:36:40+5:30
बुलडाणा जिल्ह्यातून ५ कोटीच्यावर गुंतवणुकीचा अंदाज

सुपर पॉवर घोटाळा, गुंतवणूकदारांना फुटला घाम !
बुलडाणा : मुदत ठेवीवर आकर्षक परत्याचे आमिष दाखवून दोन वर्षापूर्वी सुपर पॉवर इन्व्हेंस्टमेंट कंपनीच्या एजटांनी जिल्ह्यातील ेएकट्या लोणार तालुक्यातील हजारो नागरिकांकडून ५ कोटीच्यावर रक्कम जमा केल्याची भिती व्यक्त होत आहे. वर्षभरापूर्वीच सुपर पॉवर, केबीसी या इन्व्हेंस्टमेंट कंपन्याचा घोटाळा उघडकीस आल्यामुळे दामदुप्पट रकमेच्या आमिषाने गुंतवलेली रक्कम आता मिळणारच नसल्याचे स्पष्ट दिसत असल्याने गुंतवणुकदारांना घाम फुटला आहे. कयाच प्रकरणात औरंगाबाद गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी लोणार येथून दत्तात्रय प्रभु मापारी या एजंटास अटक केल्याने सुपर पावरचे जाळे किती खोलवर आहे हे स्पष्ट झाले.
सुपर पॉवर इन्व्हेंस्टमेंट कंपनीच्या संचालकांनी लोणार, देऊळगावराजा, सिंदखेडराजा तालुक्यात सेमीनार घेवून नोकरदार, व्यावसायीक, शेतमजुर, सर्वसामान्य नागरिकांना दामदुप्पट रकमेसह व्याज व आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक करवून घेतली. दामदुप्पट रकमेसह आकर्षक परताव्याची रक्कम पाहून तालुक्यातील शिक्षक, व्यावसायीक, शे तमजूर सर्वसामान्य नागरिकांनी व्याजाने पैसे काढून, आपल्याकडील सोने गहाण ठेवून, नातेवाईकांची मनधरणी करुन करोडो रुपये एजंटामार्फत गुंतविले.
सुपर पावर मधील एजंटांना गुंतवलेल्या रकमेवर मिळणार्या आकर्षक कमिशनमुळे या एजंटांनी आपल्या नातेवाईकांची रक्कम गुंतवली. यामुळे ना तेवाईकांचीही फसगत झाली. सुपर पावरचे बुलडाणा जिल्ह्याचे विभागीय अधिकारी कैलास महाजन यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी कंपनीचे सेमिनार घेवून यामधून गुंतवणूकदारांना कंपनीमध्ये गुंवतलेली रक्कम ९0 दिवसात दामदुप्पट, दोन ते पाच वर्षात तिप्पट दाम अधिक व्याज; अशा भुलथापा दिल्या. या भुलथा पांना बळी पडून दाम दुप्पट- तिप्पटच्या लालसेपोटी कोट्यावधी रुपयांची गुं तवणूक केली. सुरवातीचे काही महिने मोजक्याच गुंतवणूकदारांना कंपनीकडून रकमेवर मिळणार्या व्याजाचे स्टेट बँकेचे धनादेशही मिळाले. काही महिने व्यवहार सुरळीत चालल्यानंतर कंपनीने स्टेट बँकेतील आपले व्यवहार बंद केले. त्यानंतर दलाल ते कंपनी असे व्यवहार सुरु झाले. यातच गुंतवणूकदारांना धनादेश येणे बंद झाले. तसेच कंपनीकडून गुंतवणूकदारांना मिळालेले धनादेश बँकेमध्ये अनादरीत होत असल्याचे समजल्यावर आपली फसवणूक झाल्याचे गुं तवणूकदारांच्या लक्षात आले. बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा, लोणार, सिंदखेडराजा याठिकाणी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक झाली असून, औरंगाबाद पोलिस एजंटांच्या शोधात आहेत.